स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म २ जून १९८९ रोजी झाला. त्याने कारकीर्दीची सुरुवात फिरकी गोलंदाज म्हणून केली होती. परंतु पुढे त्याने फलंदाज म्हणून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ८ हजारांपेक्षा जास्त, १३९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ हजारांपेक्षा जास्त आणि टी२० सामन्यांमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त धावा घेतल्या आहेत. त्याच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत. विश्वचषतक जिंकणाऱ्या संघामध्येही त्याचा समावेश होता. त्यांच्याकडे ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद देखील होते. आयपीएलसह अन्य प्रीमियर लीग्समध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. २०१८ मध्ये एका सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामने खेळण्यास त्याच्यावर १२ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणामध्ये त्याचे कर्णधारपद गेले असे म्हटले जाते.Read More
Steve Smith Press Conference: बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने संघाच्या विजयावर प्रतिक्रिया…
भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. पण स्मिथने त्याचा अप्रतिम झेल पकडून…
Steve Smith’s thumpsup reaction: बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला माक दिली. नागपुरात भारताने एक डाव आणि १३२…