पाकिस्तानने तिसऱ्या दिवशीच दुसऱ्या कसोटीसह मालिकेत निभ्रेळ यश मिळवण्याचे आपले इरादे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने दुसऱ्या डावात २ बाद ६१ अशी मजल मारून आपली एकंदर आघाडी ३७० धावांपर्यंत लांबवली आहे. खेळ थांबला तेव्हा अझर अली आणि युनूस खान अनुक्रमे २१ आणि १६ धावांवर खेळत होते.
सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त २६१ धावांवर गुंडाळत पाकिस्तानने ३०९ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ८७ आणि मायकेल क्लार्कने ४७ धावा काढत चिवट झुंज दिली. परंतु पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने फॉलोऑन न लादता पुन्हा फलंदाजी करण्यात धन्यता मानली. पाकिस्तानचा संघ तब्बल २० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकण्याच्या उंबरठय़ावर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Nov 2014 रोजी प्रकाशित
मालिका विजयाकडे पाकिस्तानची वाटचाल
पाकिस्तानने तिसऱ्या दिवशीच दुसऱ्या कसोटीसह मालिकेत निभ्रेळ यश मिळवण्याचे आपले इरादे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने दुसऱ्या डावात २ बाद ६१ अशी मजल मारून आपली एकंदर आघाडी ३७० धावांपर्यंत लांबवली आहे. खेळ थांबला तेव्हा अझर अली आणि युनूस खान अनुक्रमे २१ …
First published on: 02-11-2014 at 03:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After batsmen bowlers do the job for pakistan