राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या पारुपल्ली कश्यपने आता दक्षिण कोरियामधील इन्चॉनला होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पध्रेतसुद्धा पदक जिंकण्याचा निर्धार केला आहे. या स्पध्रेसाठी तीन आठवडय़ांच्या विशेष सराव सत्रानंतर आपला आत्मविश्वास दुणावला असल्याचे कश्यपने या वेळी सांगितले. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत ऐतिहासिक सुवर्णपदक प्राप्त करणारा कश्यप विश्व अजिंक्यपद स्पध्रेच्या पहिल्याच फेरीत गारद झाला होता. जर्मनीच्या डायटर डॉम्केने त्याचा पराभव केला होता. ‘‘गेले काही दिवस माझी आशियाई स्पध्रेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. आता माझ्यासाठी आणि देशासाठी पदक जिंकेन,’’ असा विश्वास कश्यपने व्यक्त केला.भारतीय महिला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After commonwealth games parupalli kashyap sets sight at incheon