Anaya Bangar Shocking Allegations: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहिलेल्या संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर याने मागच्या वर्षी हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपीचा वापर करून मुलगी बनला होता. या शस्त्रक्रियेद्वारे त्याने स्वतःची अनाया बांगर अशी ओळख तयार केली. लिंगबदल केल्यानंतर अनाया भारतात परतली असून तिच्या या प्रवासाबाबतची माहिती लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत दिली. तसेच या निर्णयामुळे समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे, तसेच क्रिकेट वर्तुळातून तिच्याशी कसे वर्तन केले गेले? याबद्दलही तिने भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनाया बांगर म्हणाली की, काही क्रिकेटपटू मला नग्न फोटो पाठवत आहेत. एका क्रिकेटपटून मला गाडीत बसण्यास सांगून माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचे असल्याचे सांगितले. काही क्रिकेटपटू तर मला सर्वांसमोर शिव्या देत असून माझे नग्न फोटो मागत आहेत. खेळाच्या मैदानात आज भलेही समानतेच्या गोष्टी केल्या जात असतील, मात्र मैदानाबाहेर भेदभाव आणि गैरवर्तन तसेच आहे.

संजय बांगर यांची प्रतिक्रिया काय होती?

वडील संजय बांगर यांनी लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर काय प्रतिक्रिया दिली, याबाबतचाही खुलासा अनायाने केला आहे. मी लिंगबदल केल्यानंतर त्यांनी मला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला, असे अनायाने सांगितले.

अनाया बांगर पुढे म्हणाली की, महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर्सनाही खेळण्याची परवानगी मिळायला हवी. त्यांच्यातील टेस्टोस्टेरॉनची पातळी ही अन्य मुलीइतकीच आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघात खेळण्याची माझी इच्छा आहे.

या मुलाखतीमध्ये अनायाने मुलगी होण्याच्या निर्णयामागची पार्श्वभूमीही सांगितली. अनाया म्हणाली की, मी लहानपणी आठ-नऊ वर्षांची असताना आईचे कपडे गुपचूप घालत असे. मला आधीपासूनच वाटायचे की मुलगा नसून मुलगीच आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटूंसह क्रिकेट खेळली

अनाया ही आर्यन बांगर असताना यशस्वी जयस्वाल आणि सर्फराज खान यांच्यासह क्रिकेट खेळलेली आहे. तसेच पंजाब किग्ंजचा अष्टपैलू खेळाडू मुशीर खानबरोबरही तिने क्रिकेट खेळलेले आहे. “या क्रिकेटपटूंबरोबर खेळत असताना मी स्वतःच्या भावना दाबून ठेवत असे. कारण माझे वडील मोठे क्रिकेटपटू होते. क्रिकेट जगत ही पुरूषी अहंकार आणि असुरक्षिततेने भरलेले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anaya bangar alleges harassment post gender change says cricketers sent me nudes pics kvg