एडन हॅझर्ड याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर चेल्सी संघाने प्रीमिअर फुटबॉल लीगमध्ये कार्डिफ सिटी संघावर ४-१ असा सफाईदार विजय मिळविला.
एडन याने ३२व्या व ८१व्या मिनिटाला गोल करीत चेल्सीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सॅम्युएल एटो (६५वे मिनिट) व ऑस्कर (७७वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. कार्डिफ संघाचा एकमेव गोल जॉर्डन म्युच याने नवव्या मिनिटाला केला. हा गोल झाल्यानंतर चेल्सी संघाच्या खेळाडूंनी सुरेख सांघिक खेळ करीत विजयश्री खेचून आणली.
अन्य लढतीत साउथदम्पटन संघाने मँचेस्टर युनायटेड संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. रॉबिन व्हॅन पर्सी याने २५व्या मिनिटाला मँचेस्टरचे खाते उघडले. मात्र ८८व्या मिनिटाला साउथम्पटन संघाच्या दिजॉन लॉवरेन याने गोल करीत बरोबरी साधली.
अर्सेनेल संघाने नॉर्विक सिटी संघावर ४-१ अशी मात केली. त्या वेळी त्यांच्याकडून मॅसुट ओझिल याने दोन गोल करीत महत्त्वाची कामगिरी केली. जॅक विल्शेरी व एरॉन रॅमसे यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. नॉर्विक सिटी संघाचा एकमेव गोल जोनाथन हॉवसन याने केला.
स्वान्सी संघाने सुंदरलँड संघाचा ४-० असा धुव्वा उडविला. स्वान्सी संघाकडून फिलीप बर्डस्ले, जोनाथन डीगुझमन, विल्फ्रेड बोनी व चिको यांनी प्रत्येकी एक गोल केला.
एव्हर्टन संघाने हुल इलेव्हनचा २-१ असा पराभव केला. एव्हर्टन संघाकडून केविन मिरालोस व स्टीव्हन पिनार यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. पराभूत संघाकडून यान्निक सॅगबो याने एक गोल केला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2013 रोजी प्रकाशित
चेल्सीचा सफाईदार विजय
एडन हॅझर्ड याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर चेल्सी संघाने प्रीमिअर फुटबॉल लीगमध्ये कार्डिफ सिटी संघावर ४-१ असा सफाईदार

First published on: 20-10-2013 at 04:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arsenal chelsea take over top spots in premier league