भारताचा ज्येष्ठ ‘क्वार्टर मिलर’ आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेता एमआर पूवम्मा गेल्या वर्षी डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्याने दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. (NADA) एनएडीए च्या (अँटी-डोपिंग) उत्तेजक चाचणी विरोधी अपील पॅनेलने (ADAP) शिस्तपालन समितीचे तीन महिन्यांचे निलंबन रद्द केले. बत्तीस वर्षीय पूवम्माचा उत्तेजक नमुना गेल्या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी पटियाला येथे इंडियन ग्रांप्री १ दरम्यान घेण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तेजक (डोप) नमुन्यात पूवम्मा हिवर ह्या मेथिलहेक्सानामाइन हे प्रतिबंधित पदार्थासाठी पॉझिटिव्ह आढळली. जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सी (WADA) संहितेअंतर्गत हा प्रतिबंधित पदार्थ आहे. जूनमध्ये त्याला डोपिंगविरोधी शिस्तपालन समितीने केवळ तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते. आता एनएडीए च्या शिस्तपालन समितीच्या निर्णयाविरुद्ध अपीलमध्ये, एडीएपी ने पूवम्मावर दोन वर्षांची बंदी घातली आहे.

हेही वाचा   :  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची दमदार सुरुवात ; पुरुष संघाची उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालवर मात; महिलांचा गुजरात व तेलंगणावर विजय 

पूवम्मा २०१८ आशियाई खेळांमध्ये ४ x ४०० मीटर महिला आणि मिश्र रिले धावण्याच्या संघात सुवर्णपदक जिंकणारी सदस्य होती. २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत ४ x ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचाही ती एक भाग होती. २०१२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने वैयक्तिक ४०० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यांना २०१५ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asiad medalist poovamma banned for 2 years after failing doping test avw