वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या  तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने एकूण ४५९ धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजच्या अखेरच्या चार फलंदाजांनी कडवी झुंज देत संघाला पहिल्या डावात २७१ अशी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ३ बाद १७९ अशी मजल मारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिजने ६ बाद ९१ अशा धावसंख्येवरून सुरुवात केली. डॅरेन ब्राव्हो (८१) आणि कालरेन ब्रेथवेट (५९)यांनी सातव्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. फिरकीपटू नॅथल लिऑनने ब्रेथवेटला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर ब्राव्होने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत संघाला २७१ धावांपर्यंत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स पॅटीन्सन आणि लिऑन यांनी प्रत्येकी ४ बळी मिळवले.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही, त्यांनी ४६ धावांमध्ये दोन्ही फलंदाज गमावले. पण त्यानंतर कर्णधार स्टिव्हन स्मिथ (नाबाद ७०) आणि उस्मान ख्वाजा (५६) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी करत दिवसअखेर ३२ षटकांमध्ये तीन फलंदाज गमावत १७९ धावा केल्या आहेत.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia extend lead to 459 runs on day