ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी मातब्बर प्रतिस्पर्ध्यांमध्ये कडवा प्रतिकार पाहायला मिळतो. मात्र ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा या वर्षांतल्या पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत खेळाडूंना प्रतिकूल हवामानाशी झुंज द्यावी लागत आहे. मेलबर्नमध्ये पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने विजय मिळवण्यासाठी खेळाडूंना अक्षरक्ष: घाम गाळावा लागत आहे. मारिया शारापोवाने मेलबर्नच्या रखरखत्या उन्हात तब्बल तीन तास २८ मिनिटे सामना खेळून इटलीच्या कॅरेन क्नॅप हिचा ६-३, ४-६, १०-८ असा पराभव केला.
विजयानंतर शारापोवाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांवर नाराजीही व्यक्त केली. सामन्याच्या एका वेळी माझा पराभवच होणार आहे. असे वाटत होते परंतु, अखेर मी विजय मिळाल्याने आनंद आहे. येथील तापमानात खेळणे खरेच आव्हानात्मक आहे. मूळात याचा प्रकृतीवर परिणाम होण्याची मोठी शक्यता आहे. असेही शारापोवा म्हणाली.
निसर्गाच्या या प्रकोपामुळे खेळाडूंना चक्कर येणे, उलटी, थकवा, पायात गोळे येणे, यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बर्फाची पिशवी आणि ऊर्जावर्धक पेय यांच्या आधारावरच खेळाडूंची वाटचाल सुरू आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे विविध व्याधींनी हैराण झालेल्या खेळाडूंना माघारीचा मार्ग पत्करण्यावाचून पर्याय उरलेला नाही. आतापर्यंत तब्बल दहा खेळाडूंनी दुखापती आणि अतिउष्ण हवामानामुळे माघार घेतली आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open maria sharapova battles for three hours 28 minutes in 40 degree celsius