यावेळीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एका मागोमाग एक आश्चर्यजनक पराभव पहायला मिळत असताना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने मात्र, सुखरूपरित्या स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

बल्गेरिआच्या जिर्जोर डिमट्रोवर ३-६, ७-६(३), ७-६(७), ६-२ असा विजय मिळवत राफेल नदालने उपांत्य फेरीचे दार ठोठावले आहे. सामन्याच्या दुसऱया सेटमध्ये डिमट्रोवने पुनरागमन करत नदालला कडवी झुंज दिली मात्र, टायब्रेकर पॉईंटमध्ये नदालने ९-७ ने आघाडी घेतली. ही आघाडी नदालने त्यापुढील सेट्समध्येही कायम राखली आणि सामन्याच्या अखेरीस विजय साजरा केला. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना नदाल म्हणाला, मी स्वत:ला नशीबवान समजतो. कारण, सामना खरंच रंजक झाला होता. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झालो याचा नक्कीच मला आनंद आहे. असेही नदाल म्हणाला.
याही पेक्षा चांगली कामगिरी करण्याची इच्छा असल्याचे नदाल म्हणाला. माझ्या चाहत्यांना मी नक्कीच निराश करणार नाही. विजेतेपद गाठणे हेच माझे लक्ष्य असल्याचेही नदालने म्हटले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open rafael nadal made to work hard for semis berth