Silesia Diamond League, Avinash Sable qualifies 2024 Paris Olympic: महाराष्ट्राच्या मराठमोळ्याअविनाश साबळेने रविवारी पार पडलेल्या सिलेसिया डायमंड लीग स्पर्धेतील ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर राहिला. याबरोबरच तो २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. भारताकडून अ‍ॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा सहावा खेळाडू ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय चॅम्पियन साबळेने ८:११.६३ मिनिटात हे अंतर पूर्ण केले, जे त्याच्या ८:११.२० या राष्ट्रीय विक्रमापेक्षा थोडे चांगले आहे. २८ वर्षीय खेळाडूने मात्र पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठीच्या वेळेआधीच ही स्पर्धा पूर्ण केली. ८:१५ सेकंदांच्या फरकाने मोठ्या फरकाने त्याने ही कामगिरी केली. पात्रता कालावधी १ जुलै २०२३ पासून सुरू झाला असून ३० जून २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे.

हेही वाचा: Wimbledon 2023: “माझ्या जन्मापूर्वी तू…”, १६ वर्षांनी लहान अल्कराझने वयाचा उल्लेख करताच जोकोव्हिचला हसू अनावर

बक्कली सौफियाने ठरला सिलेसिया डायमंड लीगचा चॅम्पियन

मोरोक्कन विश्व आणि ऑलिम्पिक चॅम्पियन एल बक्कली सूफीनने ८:०३.१६ च्या विक्रमी वेळेत शर्यत जिंकली, तर केनियाचा अब्राहम किबिवोट (८:०८.०३) आणि लिओनार्ड किपकेमोई बेट (८:०९.४५) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.

हेही वाचा: Wimbledon 2023: सामन्यादरम्यान नोव्हाक जोकोव्हिच संतापला, रागाच्या भरात त्याने असे काही केले की…; पाहा Video

अविनाश हा सहावा आणि पहिला ट्रॅक अ‍ॅथलीट ठरला

अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा सहावा भारतीय आणि देशातील पहिला ट्रॅक अ‍ॅथलीट ठरला. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीयांच्या यादीत तो पुरुषांच्या स्पर्धेत अक्षदीप सिंग, विकास सिंग आणि परमजीत सिंग बिश्त या चार २० किमी रेस वॉकरसह आणि महिलांच्या स्पर्धेत प्रियांका गोस्वामी आणि लांब उडीपटू मुरली श्रीशंकर यांच्यासह त्याने तो ऑलिम्पिकसाठी पात्र झाला आहे.

साबळेसाठी ही वर्षातील तिसरी डायमंड लीग स्पर्धा होती. वेळेच्या दृष्टीने ही त्यांची डायमंड लीग टप्प्यातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने मोरोक्कोच्या रबात येथे ८:१७.१८ च्या वेळेसह १०वे आणि स्टॉकहोममध्ये ८:२१.८८ मध्ये पाचवे स्थान पटकावले होते. साबळे आधीच बुडापेस्ट, हंगेरी येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avinash qualifies for paris olympics sable finishes sixth in diamond league avw