युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने मकाऊ ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. स्पर्धेत भारताचे एकमेव प्रतिनिधी राहिलेल्या अव्वल मानांकित सिंधूने पाचव्या मानांकित हाँगकाँगच्या त्स्झ का चेनवर २१-१७, २१-१२ असा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये दोघींमध्ये चुरशीचा मुकाबला रंगला. १७-१७ अशा बरोबरीच्या स्थितीतून सिंधूने सलग चार गुणांची कमाई करीत पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये चेनने आघाडी घेतली होती, मात्र सिंधूने ३-३ अशी बरोबरी केली. त्यानंतर सातत्याने आघाडी वाढवत सिंधूने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला. दुसऱ्या गेममध्ये जोरदार रॅली, स्मॅशेस आणि नेटजवळचा अचूक खेळ सिंधूच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-11-2013 at 12:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badminton sindhu to play in semifinals of macau gp prix badminton cup