Perth Scorchers vs Melbourne Renegades canceled due to poor pitch : बिग बॅश लीग २०२३ मधील पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामना खराब खेळपट्टीमुळे रद्द करावा लागला. हा सामना जीएमएचबीए स्टेडियमवर खेळला जात होता. येथील खेळपट्टीबाबत सामन्यापूर्वीच चिंता व्यक्त करण्यात येत होती. गिलाँगमध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे खेळपट्टीवर कव्हरखाली पाणी साचले होते. त्यामुळे गोलंदाजांना सामन्यात चांगलीच उसळी मिळत होती. त्यामुळे फलंदाजांची सुरक्षा धोक्यात आली आहे. रेनेगेड्सने स्कॉर्चर्स संघाने ६.५ षटके टाकल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेळपट्टीवरील ओलसर भागामुळे ही समस्या गंभीर बनली असून त्यामुळे फलंदाजांना त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा-जेव्हा गोलंदाजांनी त्या भागात गोलंदाजी केली, तेव्हा चेंडू विचित्रपणे उसळला. सामना सुरू ठेवण्याबाबत कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा झाली. मायकेल वॉनने अॅडम गिलख्रिस्टला विचारले की खेळ चालू ठेवू द्यावा का? “फलंदाजांना खरा धोका आहे की फलंदाजी करणे खरोखर कठीण आहे?” गिलख्रिस्टने उत्तर दिले, “मला वाटते की खरोखर धोका आहे.” खेळ थांबला तेव्हा स्कॉर्चर्सची धावसंख्या ६.५ षटकांत २ गडी गमावून ३० धावा होती.

खेळपट्टीची अशी अवस्था का झाली?

हा सामना जिलॉन्गच्या सिमंड्स स्टेडियमवर खेळला जात होता. काल रात्री येथे पाऊस झाला. खेळपट्टीवर काही डाग दिसतात ज्यावरून असे दिसते की कव्हरमधून पाणी खेळपट्टीवर पोहोचले आहे. त्यामुळेच खेळपट्टीवर अनियमित बाऊन्स दिसू लागले. त्यामुळे फलंदाजांना दुखापत होऊ शकली असते. ६.५ षटकांच्या खेळातील खेळपट्टीचे जीवघेणे स्वरूप पाहून क्रिकेटपटूही आश्चर्यचकित झाले. विकेटकीपिंग करणारा क्विंटन डी कॉकही काही चेंडूंवर अवाक होताना दिसला. या घटनेनंतर बिग बॅश लीगचे आयोजक आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाची चांगलीच नाचक्की झाली आहे. कारण यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळपट्ट्यांवर प्रश्न उपस्थित केले होते.

हेही वाचा – IND vs SA 1st T20: आजच्या सामन्यात पाऊस खोडा घालणार का? जाणून घ्या डरबनमधील हवामान अंदाज आणि टीम इंडियाची आकडेवारी

ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळपट्ट्यांवर उपस्थित केले होते प्रश्न –

याआधी, २०२३ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय खेळपट्ट्यांबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने काही भारतीय खेळपट्ट्या अतिशय खराब असल्याचे वर्णन केले होते. पण आता त्यांच्याच घरात अशा खेळपट्ट्या पाहायला मिळत आहेत, त्यामुळे फलंदाजांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. बिग बॅश लीगमध्ये अशा खेळपट्ट्यांवर सामने आयोजित करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bbl 2023 match between perth scorchers vs melbourne renegades at simmonds stadium geelong canceled due to poor pitch vbm
Show comments