Ruturaj Gaikwad missed the third ODI due to injury : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला. ऋतुराज गायकवाड तिसऱ्या सामन्यातून बाहेर ठेवले. गायकवाडच्या जागी रजत पाटीदारला संघात संधी मिळाली आणि या सामन्यातून रजत पाटीदारने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिसर्‍या सामन्यात गायकवाडची अनुपस्थिती प्रत्येक चाहत्यासाठी आश्चर्यकारक होती. पण बीसीसीआयने याबाबतची माहिती शेअर केली आहे. बीसीसीआयने सांगितले ऋतुराज गायकवाड का तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात सहभागी नव्हता?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला झाली होती दुखापत-

ऋतुराज गायकवाड मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या वनडे सामन्यात खेळताना दिसला होता. मात्र, दोन्ही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. मात्र तिसऱ्या सामन्यातून त्याला वगळण्याचे कारण गायकवाडचा खराब फॉर्म नसून दुखापत हे आहे. होय, दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापत झाली आहे. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे.

दुखापत थोडी गंभीर होती, त्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यातून बाहेर राहावे लागले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत एक्स खात्यावरही याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयने लिहिले की, ‘दुसऱ्या सामन्यात ऋतुराजच्या बोटाला दुखापत झाली होती आणि तो पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. सध्या ऋतुराज हा बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.’

हेही वाचा – IND vs SA 3rd ODI : सॅमसन दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय, विराटच्या विक्रमाशी केली बरोबरी

ऋतुराजच्या जागी रजतला मिळाली संधी –

तिसऱ्या वनडेत ऋतुराज गायकवाडच्या जागी रजत पाटीदारला संधी मिळाली. टीम इंडियासाठी रजत पाटीदारचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. रजतला फार मोठी खेळी खेळता आली नसली तरी त्याने आपल्या छोट्या खेळीत काही चांगले शॉट्स खेळले. रजत पाटीदारने आपल्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात २२ धावांची खेळी खेळली. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत २९६ धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने अप्रतिम शतक झळकावले. संजूने तिसऱ्या सामन्यात १०८ धावा करताना वनडेतील पहिले शतक झळकावले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci says ruturaj gaikwad missed the 3rd odi match due to injury aginst south africa in boland park paarl vbm