scorecardresearch

ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा भारतीय फलंदाज आहे. त्याचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी पुण्यामध्ये झाला. सुशिक्षित घरामध्ये वाढलेल्या ऋतुराज (Ruturaj) लहानपणापासून क्रिकेटवर प्रेम होते. त्याने पिंपरी चिंचवडच्या दिलीप वेंगसकर अकादमीमधून क्रिकेटचे धडे गिरवले. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी २०१६-१७ रणजी करंडक स्पर्धेत त्याने महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे २०१७ मध्ये त्याला विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळत असताना आयपीएल २०१९ मध्ये त्याला चैन्नईच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोनं करत त्याने अनेक चाहत्यांची मने जिंकली. तो सीएसके संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. आयपीएलमधील कामगिरीकडे पाहून भारतीय संघामध्ये त्याची निवड करण्यात आली.

२०२१ मध्ये ऋतुराज गायकवाड पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. काही महिन्यांपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने एका षटकामध्ये तब्बल सात षटकार मारण्याचा विक्रम केला. मराठी अभिनेत्री सायली संजीवला तो डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Read More
Ruturaj Gaikwad to replace injured Virat Kohli for Afghanistan ODIs Rajat Patidar for India A IND vs AFG
ऋतुराज गायकवाडची टीम इंडियात होणार एन्ट्री! विराट कोहलीची घेणार जागा; तर रजत पाटीदारसाठी देखील उघडणार टीम इंडियाचे दरवाजे

Virat Kohli Replacement: विराट कोहली अफगाणिस्तानविरूद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी दिली जाणार, याची माहिती…

ruturaj gaikwad
Team India: बीसीसीआयचा मोठा निर्णय! ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात स्थान; रियान पराग बाहेर

Team India A Squad: भारतीय अ संघ तिरंगी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेआधी बीसीसीआयकडून मोठी अपडेट देण्यात आली…

ruturaj gaikwad
6 Photos
IPL 2026: कोट्यवंधीचे मानधन अन् मैदानावर फ्लॉप! IPL २०२६ नंतर ‘या’ ४ संघांचे कर्णधार बदलणार?

IPL 2026 Captaincy Update: आयपीएल २०२६ मध्ये फ्लॉप ठरलेल्या हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड आणि अक्षर पटेल यांचे कर्णधारपद…

Ruturaj Gaikwad and entire CSK Team punished for Slow over rate in match vs Gujarat Titans IPL 2026
IPL 2026: तेलही गेलं आणि तूपही गेलं! गुजरातकडून हरल्यानंतर ऋतुराजसह संपूर्ण CSK संघावर BCCIची दंडात्मक कारवाई; काय आहे कारण?

CSK Team Fined: चेन्नई सुपर किंग्सला स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता बीसीसीआयने संपूर्ण संघाला शिक्षा ठोठावली…

Ms Dhoni with ruturaj gaikwad
Ruturaj Gaikwad: एमएस धोनी २०२७ मध्येही CSKकडून खेळणार? ऋतुराज गायकवाडने दिली मोठी अपडेट, सामन्यानंतर म्हणाला…

Ruturaj Gaikwad on MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने महान क्रिकेटपटू एमएस धोनीच्या भवितव्यावर…

Ruturaj Gaikwad Statement on Tough IPL 2026 Season For CSK Said fact that we are a young team in transition
CSK vs GT: “अनेकांना हे मान्यच नाहीये की आम्ही…”, ऋतुराजचं CSKच्या स्पर्धेतील खराब कामगिरीबाबत मोठं वक्तव्य; खरं कारण सांगत म्हणाला…

Ruturaj Gaikwad on Defeat: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला इतिहासातील मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. संघाच्या या पराभवानंतर ऋतुराज…

shubman gill
GT vs CSK, IPL 2026: चेन्नईचा IPL स्पर्धेतील सर्वात मोठा पराभव! गुजरातचा दमदार विजय अन् टॉप २ मध्ये स्थान निश्चित

CSK Knocked Out of IPL 2026: आयपीएल २०२६ मधील ६६ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा ८९ धावांनी पराभव…

Ms Dhoni with ruturaj gaikwad
Ms Dhoni: ऋतुराजला स्पष्ट सांगितलंय की…”, चेपॉकवर शेवटच्या सामन्याआधी धोनीचा मोठा खुलासा; म्हणाला…

Ms Dhoni Advice To Ruturaj Gaikwad: चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्याआधी एमएस धोनीने ऋतुराज गायकवाडला दिलेल्या…

akash singh celebration
LSG vs CSK, IPL 2026: “विकेट कशी घ्यायची, चांगलंच माहितेय…”, आकाश सिंगच्या माऱ्यासमोर संजू- ऋतुराज गार; हटके सेलिब्रेशनची सोशल मीडियावर चर्चा, VIDEO

Akash Singh wickets and celebration: भारतीय वेगवान गोलंदाज आकाश सिंगने मैदानात आपल्या भेदक माऱ्याने ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि उर्विल…

Ruturaj Gaikwad Hilarious answer on Young fan questio said i scared of my wife more than bouncers
“बाऊन्सरला नाही बायकोला जास्त घाबरतो…”, भर कार्यक्रमात ऋतुराज गायकवाडची कबुली; नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल

Ruturaj Gaikwad Video: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधाराने बायकोला घाबरतो म्हणणारा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

chennai super kings
CSK Playoffs Scenario: चेन्नईच्या फॅन्ससाठी गुड न्यूज! CSK कडे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी; करावं लागेल ‘हे’ एकच काम

Chennai Super Kings Playoffs Scenario: चेन्नई सुपर किंग्सकडे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

संबंधित बातम्या