डॅरेन ब्रेन्टने अतिरिक्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर फुलहॅम संघाने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. फुलहॅमने सामन्याच्या पूर्वार्धात मिळवलेली आघाडी मोडून काढत मँचेस्टर युनायटेडने आगेकूच केली, मात्र अतिरिक्त वेळेत ब्रेन्टच्या गोलमुळे युनायटेडची संधी हुकली आणि गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या फुलहॅमविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले.
स्टीव्ह सिडवेलने १९व्या मिनिटाला गोल करत फुलहॅमला आघाडी मिळवून दिली. या आघाडीच्या साह्य़ाने गुणतालिकेत तळाशी असणारा फुलहॅमचा संघ मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का देणार असे चित्र होते. मात्र सामन्याच्या शेवटच्या मिनिटांमध्ये ब्रेन्टच्या गोलने फुलहॅमचे सनसनाटी विजयाचे स्वप्न भंगले. प्राथमिक गटाच्या ९ लढतींमध्ये प्रतिस्पध्र्याचे २७ गोल झेलणाऱ्या फुलहॅमच्या संघाने जिद्दीने खेळ करत मँचेस्टर युनायटेडला जेरीस आणले. सामना संपायला १२ मिनिटे बाकी असताना रॉबिन व्हॅन पर्सीने गोल करत मँचेस्टर युनायटेडला बरोबरी करून दिली. दोनच मिनिटांमध्ये मायकेल कॅरिकने गोल करत मँचेस्टर युनायटेडला विजयासमीप नेले, मात्र ब्रेन्टच्या गोलने सामन्याचे चित्रच पालटले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2014 रोजी प्रकाशित
इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल : मँचेस्टर युनायटेडची बरोबरी
डॅरेन ब्रेन्टने अतिरिक्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर फुलहॅम संघाने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली.
First published on: 11-02-2014 at 03:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bent stuns man united by giving fulham 2 2 draw