महेश भूपती आणि सानिया मिर्झा या टेनिसपटूंना पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्यामुळे एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. भूपती आणि डॅनियल नेस्टॉर या तिसऱ्या मानांकित जोडीला पुरुष दुहेरीतील सलामीच्या सामन्यात स्पेनचा फेलिसियानो लोपेझ आणि कॅनडाचा मिलोस राओनिक यांनी ४-६, ६-७ (४) असे हरवले. महिला दुहेरीत सानिया आणि अमेरिकेची बेथनी मट्टेक सँड्स यांना अमेरिकेची लिसा रेमंड आणि ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर यांनी ७-६ (८), ३-६, ६-१० असे पराभूत केले. सोमदेव देववर्मनला मुख्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले होते. तसेच रोहन बोपण्णा आणि राजीव राम यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2013 रोजी प्रकाशित
भूपती-नेस्टॉर, सानिया पराभूत
महेश भूपती आणि सानिया मिर्झा या टेनिसपटूंना पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्यामुळे एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
First published on: 11-03-2013 at 02:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhupati nestor saniya defeated