भारतीय संघाने २०११ साली वनडे वर्ल्डकप जिंकत अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला होता. दरम्यान २०११ च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील एका खेळाडूवर बॉलीवूड अभिनेत्री पाखी शर्मा हिने धक्कादायक आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर तिने ‘वन नाईट स्टॅन्ड’ केल्याचा मोठा दावा केला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री पाखी शर्मा ही इंडस्ट्रीमध्ये बॉबी डार्लिंग या नावाने ओळखली जाते. अनेक हिंदी सिनेमांमध्ये दिसणारी बॉबी ही ट्रान्सजेंडर अभिनेत्री आहे. बॉबी डार्लिंग ही तिने दिलेल्या मुलाखतीमुळे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तिचं एकेकाळी भारतीय संघाच्या स्टार क्रिकेटपटूबरोबर अफेयर असल्याचं गाजलं होतं. आता तिने दिलेल्या मुलाखतीत त्यांचं नातं का तुटलं, याबाबत खुलासा केला आहे.
‘बॉलिवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी डार्लिंगने धक्कादायक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीला या मुलाखतीत विचारण्यात आलं की, तिचं नाव एकदा आघाडीच्या क्रिकेटपटूसह जोडलं गेलं होतं, तर ती नेमकी कहाणी काय आहे? यादरम्यान उत्तर देताना तिने स्वत: क्रिकेटपटूच्या नावाचा उल्लेख केला. हा क्रिकेटपटू म्हणजे मुनाफ पटेल.
बॉबी या मुलाखतीत म्हणाली, “आम्ही चांगले मित्र होतो. आम्ही अशोका हॉटेलच्या एका क्लबमध्ये भेटलो होतो. नंतर अनेकदा आम्ही क्लबिंग केलं, ड्रिंक्ससाठी भेटलो आणि मग पार्टी वगैरे आलो. कदाचित लोकांनी पाहिलं असावं किंवा कोणाबरोबर तरी बोलताना माझ्या तोंडून निघालं असेल की, मुनाफ पटेलला भेटली होती आणि आम्ही एकत्र पार्टी वगैरे केलेली. तेव्हा लोकांनी याचा चुकीचा अर्थ काढला असावा. कारण तेव्हा माझी प्रतिमा मी फ्लर्ट करते अशी होती.”
“आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो असं मी म्हणणार नाही, कारण मला त्याची ओढ निर्माण झाली होती. कारण आम्ही भेटायचो आणि दोन जण तेव्हाच भेटतात जेव्हा त्यांना आकर्षण असतं. आकर्षण होतं, मग आम्ही प्रेमात पडलो. प्रेम तर होतं, पण त्याला मी आता काय बोलू. चला आता हेच सांगते की ते वन नाईट स्टँडसारखं होतं.”, असं ती पुढे म्हणाली.
बॉबी डार्लिंगला जेव्हा विचारण्यात आलं की ते दोघं वेगळे का झाले, तेव्हा ती म्हणाली. “त्याला राग आला जेव्हा मी मीडियामध्ये कळलं. तेव्हा मी मुलाखतीत प्रेमाची कबुली दिली होती. जे आहे ते मी सांगितलं. तर तो म्हणाला, अरे मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तू असं करायला नको होतं. संपूर्ण संघामध्ये माझी किती बदनामी होईल.” बॉबीने शेवटी असंही सांगितलं की त्याने तिचं फोनही उचलणं बंद केलं.