T20 WC: “खेळाडूंमध्ये पेट्रोल भरून…”, शेवटच्या सामन्यात रवी शास्त्रींनी ICCला सुनावलं!

शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

Cannot drive away players by pouring petrol says coach ravi shastri
रवी शास्त्री आणि टीम इंडिया

टी-२० विश्वकरंडक २०२१ स्पर्धेत भारताने नामिबियाला हरवत शेवट गोड केला. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला वर्ल्डकप उंचावता आला नाही. टी-२० कप्तान म्हणून विराटची ही शेवटची आयसीसी स्पर्धा होती. त्याचसोबच टीम इंडियाचे हेड कोच म्हणून रवी शास्त्रीचीही ही शेवटची स्पर्धा ठरली. नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी शास्त्रींनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही (आयसीसी) सुनावले.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, ”सहा महिने बायो बबलमध्ये राहणे सोपे नाही. खेळाडूंमध्ये पेट्रोल भरून त्यांना पळवता येत नाही. आयसीसी व्यतिरिक्त सर्व बोर्डांना करोनाबद्दल विचार करावा लागेल. खेळाडूंवर मानसिक परिणाम झाला आहे. स्पर्धांमध्ये ब्रेक असला पाहिजे. यासाठी पावले उचलली नाहीत, तर खेळाडू स्वत: खेळण्यास नकार देऊ शकतात. संघाच्या कामगिरीने मी निराश नाही.”

रवी शास्त्री म्हणाले, ”हा तोच संघ आहे ज्याने गेल्या पाच वर्षांत जगाचा कानाकोपरा जिंकला आहे. ऑस्ट्रेलियात दोनदा कसोटी मालिका जिंकणे आणि इंग्लंडमध्ये आघाडी घेणे खूप छान आहे. ऑस्ट्रेलियात ७० वर्षांत कोणीही हे करू शकले नाही.”

हेही वाचा – IPL 2022 : RCBला मिळू शकतो ‘मुंबईकर’ कप्तान..! टीम इंडियाच्या सलामीवीराचेही नाव चर्चेत

”संघाने कसोटी व्यतिरिक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवला. वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये भारताने विजय मिळवला. प्रशिक्षक म्हणून मी काही विचार करून आलो होतो, त्याहून अधिक साध्य केले. पूर्ण प्रामाणिकपणे काम केले”, असेही शास्त्रींनी म्हटले.

रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. राहुल द्रविडला संघाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून द्रविड नवी जबाबदारी खांद्यावर घेईल. मालिकेत नवीन खेळाडूंना संधी मिळू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cannot drive away players by pouring petrol says coach ravi shastri adn

Next Story
T20 WC:…म्हणून टीम इंडिया नामिबिया विरुद्धच्या सामन्यात दंडाला काळी रिबन बांधून मैदानात उतरली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी