Saleem Dar smashed 193 runs off just 43 balls : युरोपियन क्रिकेट मालिकेतील ४५ व्या सामन्यात मंगळवारी सोहल हॉस्पिटलटेट आणि कॅटालोनिया जग्वार आमनेसामने होते. या सामन्यात कॅटालोनिया जग्वारचा सलामीवीर हमजा सलीम दारने अवघ्या ४३ चेंडूत नाबाद १९३ धावांची खेळी करत विक्रमांची रांग लावली. त्याने अवघ्या २४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यामुळे कॅटालोनिया जग्वार संघाने हा सामना १५७ धावांनी जिंकला. सलीमच्या १९३ धावाशिवाय यासिल अलीने ५८ धावांचे योगदान दिले. यासिरने १९ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि सात षटकार आले. त्याचा स्ट्राइक रेट ३०५.२६ होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका षटकात कुटल्या ४३ धावा –

सलीमने आपल्या ऐतिहासिक खेळीत १४ चौकार आणि २२ षटकार मारले. त्याने ४४८.८३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि अवघ्या २४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रमही केला. कॅटालोनियाच्या डावातील नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या महंमद वारिसच्या षटकात एकूण ४३ धावा आल्या. सलीमने या षटकात सलग सहा षटकार ठोकले. नऊ चेंडूंच्या या षटकात दोन वाइड आणि एक नो बॉलचाही समावेश होता. सलीमने या षटकात चौकार मारला आणि त्यानंतर त्याने सलग सहा षटकार ठोकले.

कॅटालोनिया संघाने एकही गमावली नाही विकेट –

प्रथम फलंदाजी करताना कॅटालोनिया संघाने निर्धारित १० षटकात एकही विकेट न गमावता २५७ धावा केल्या. सलीमने १९३ धावांची नाबाद खेळी, तर यासिरने ५८ धावांची नाबाद खेळी खेळली. दोन षटकांत ४४ धावा देणारा शहजाद खान सोहल संघाचा सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला. संघाच्या एकाही खेळाडूला विकेट मिळाली नाही. २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोहल हॉस्पिटलटेटचा संघ आठ गडी गमावून केवळ १०४ धावाच करू शकला. त्यामुळे त्यांना १५३ धावांनी सामना गमावला. रझा शहजादने सर्वाधिक २५ धावा केल्या.

हेही वाचा – LLC 2023 : गौतम गंभीरवर टीका करणे श्रीसंतला पडले महागात, एलएलसी आयुक्तांनी बजावली कायदेशीर नोटीस

हमजा सलीम दारची गोलंदाजीतही शानदार कामगिरी –

कमर शहजाद २२ धावा करून बाद झाला, तर आमिर सिद्दीकी १६ धावा करून बाद झाला. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. कॅटालोनियासाठी हमजा सलीम दार गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत तीन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय फैजल सरफराज, फारुख सोहेल, अमीर हमजा आणि कर्णधार उमर वकास यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. सलीमने दोन षटकांत १५ धावा देत तीन बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Catalonia jaguar opener hamza saleem dar smashed 193 runs off just 43 balls and set a record in european cricket series vbm