बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय वेटलिफ्टिंगपटू लव्हप्रीत सिंगने १०९ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे. हे भारताचे एकूण १४वे तर वेटलिफ्टिंगमधील नववे पदक ठरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याने स्नॅचमध्ये १६३ किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये १९२ किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण ३५५ किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकले. कॅमेरूनच्या ज्युनियर पेरीस्लेक्सने ३६१ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर सामोनच्या जॅक हिटिला याने एकूण ३५८ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.

भारताच्या लव्हप्रीत सिंग सर्व सहा प्रयत्नांमध्ये अतिशय सराईतपणे खेळ केला. स्नॅचमध्ये त्याने पहिल्या प्रयत्नात १५७ किलो वजन उचलले, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात अनुक्रमे १६१ आणि १६३ किलो वजन उचलले. यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने पहिल्या प्रयत्नात १९६ किलो वजन उचलले. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात १८९ आणि १९२ किलो वजन उचलले.

हेही वाचा – विश्लेषण : भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देणारा ‘लॉन बॉल्स’ हा खेळ नेमका आहे तरी कसा?

२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतीय वेटलिफ्टिंगपटूंनी जोरदार कामगिरी केली आहे. मीराबाई चानू, जेरेमी लालरिन्नुगा आणि अचिंत शेउली यांनी स्वर्ण, संकेत महादेव सरगर, बिंदियारानी देवी आणि विकास ठाकुर यांनी रौप्य तर गुरुराजा ठाकुर, हरजिंदर कौर आणि लव्हप्रीत सिंग यांनी कांस्यपदक पटकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commonwealth games 2022 weightlifter lovepreet singh won bronze medal in 109 kg category vkk