करोनामुळे सध्या जगभरात चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. चीन, युरोप यासारख्या प्रांतात करोनामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. भारतामध्ये प्रत्येक दिवशी करोनाने बाधित असलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. क्रीडा क्षेत्रालाही करोनाचा फटका बसला आहे. बीसीसीआय आणि अन्य क्रीडा संघटनानंनी देशातील महत्वाच्या स्पर्धा तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. सर्व भारतीय खेळाडू सध्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवणं पसंत करत आहेत.
अवश्य वाचा – करोनाचा धसका : घरात वेळ घालवण्यासाठी श्रेयस अय्यर काय करतोय पाहा…
अनुष्का शर्माने आपला पती विराट कोहलीसोबतचा एक भन्नाट फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. क्वारंटाईन झाल्यापासून आम्ही एकमेकांच्या अधिक प्रेमात पडत आहोत, अशी कॅप्शन अनुष्काने आपल्या फोटोला दिली आहे. नेटकऱ्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दर्शवली आहे.
काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काने एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना सध्याच्या कठीण काळात सुखरुप राहण्याची विनंती केली होती.
२०१७ साली विराट आणि अनुष्का यांचं इटलीत लग्न झालं. त्याआधी विराट-अनुष्का अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. अनेकदा अनुष्का विराटला खेळताना पाहण्यासाठी मैदानात हजर असते. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे…त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू आता मैदानात कधी परततायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.