भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज लोकेश राहुलने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची तोंडभरून स्तुती केली आहे. धोनीने कर्णधारपदी मोठे सामने आणि विजेतेपदेच नाही, तर प्रत्येक खेळाडूचा सन्मानही जिंकला आहे. त्याच्यासाठी कोणताही खेळाडू विचार न करता बंदुकीची गोळी खाण्यासही तयार आहे, असे राहुलने म्हटले. राहुल सध्या भारतीय संघासमवेत इंग्लंड दौऱ्यावर आहे.

फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला, “धोनीने खूप स्पर्धा जिंकल्या आहेत, देशासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत, परंतु मला वाटते, की कर्णधार म्हणून आपल्यासाठी सर्वात मोठी कामगिरी म्हणजे आपल्या संघातील सहकाऱ्यांचा सन्मान आहे. कोणीही याचा विचार न करता त्याच्यासाठी गोळी अंगावर घेईल.”

लोकेश राहुल

 

हेही वाचा – सचिन तेंडुलकरचा मुलगा महेंद्रसिंह धोनीला हवीय शिक्षकाची नोकरी!

२०१४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे राहुलने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीची ही शेवटची कसोटी होती. राहुल म्हणाला, “जेव्हा कोणी कर्णधार म्हणतो, तेव्हा आपल्या पिढीतील पहिले नाव धोनीचे समोर येते. आम्ही सर्व त्याच्या नेतृत्वात खेळलो आहोत. नम्रता ही गोष्ट मी त्याच्याकडून शिकलो आहे, त्याने सर्व गोष्टीत आपल्या देशाला सर्वात आधी प्राधान्य दिले आहे आणि हे अविश्वसनीय आहे.”

हेही वाचा – काय सांगता..! टोकियो ऑलिम्पिकमध्ये ‘ही’ घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

धोनीने २८ वर्षानंतर टीम इंडियासाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तो आयसीसीची तिन्ही विजेतेपदे पटकावणारा एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७चा टी0-२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.