पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अकरमने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. वसीम अकरमला टक्कल पडलेलं पाहून अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे. या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत. अनेक नेटकऱ्यांना त्याला मजेशीर कमेंट्स देखील केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी १२ दिवस क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर अखेर रेझर मिळालं. आता मी आनंदी आहे.”, अशी पोस्ट त्यांनी फोटो शेअर करताना केली आहे. तसेच क्वारंटाइन लाईफ असा हॅशटॅगही दिला आहे. ऑस्ट्रेलियातील एडिलेडमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. ऑस्ट्रेलियात करोना रोखण्यासाठी कडक नियमावली आहे. गेल्या १२ दिवसांपासून अकरम क्वारंटाइनमध्ये आहे.

फोटोत त्याने विग घातल्याचं स्पष्ट दिसत आहे. अकरमची हेअर स्टाईल नेटकऱ्यांना पसंतीस उतरत आहे. नेटकरी त्या फोटोखाली एडिट केलेले फोटो शेअर करून मज्जा घेत आहेत.

वसीम अकरम क्रिकेट कारकिर्दीत १०४ कसोटी आणि ३५६ एकदिवसी या सामने खेळला आहे. कसोटीत त्याने ४१४ गडी बाद केले आहेत. तर एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर ५०२ गडी आहेत. वसीम अकरमने कसोटीत ३ शतकं आणि ७ अर्धशतकं झळकावली आहे. एकदिवसीय सामन्यात ६ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer wasim akram share bald photo on social media rmt