आयपीएलच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या सुरेश रैनाला लिलावादरम्यान एकही खरेदीदार मिळाला नाही. लिलावात तो विकला न गेल्याने चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. आयपीएल लिलावात सुरेश रैनाची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. मात्र, कोणत्याही फ्रेंचायझीने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. त्याचा जुना संघ चेन्नई सुपर किंग्जनेही त्याच्यासाठी बोली लावली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवर रैनाचे इतक्या वर्षांच्या सेवेबद्दल आभार मानले. “पिवळ्या जर्सीतील अनेक आठवणींसाठी सुपर थँक्स चिन्ना थाला”, असे चेन्नईने म्हटले.

सुरेश रैना त्याच्या आयपीएल कारकिर्दीत फक्त दोन संघांसाठी खेळला आहे. तो ११ हंगाम सीएसकेकडून खेळला आणि दोन वर्षे गुजरात लायन्स संघाचा भाग होता. करोनामुळे त्याने एका हंगामातून आपले नाव मागे घेतले.

हेही वाचा – IPL Auction : दुनिया हिला देंगे..! महालिलावानंतर ‘असा’ आहे मुंबई इंडियन्सचा पूर्ण संघ

रैना हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने या लीगमध्ये अनेक शानदार खेळी खेळल्या. तो या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू आहे. त्याने २०५ सामन्यांमध्ये १३६.७६च्या स्ट्राइक रेटने ५५२८ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि ३९ अर्धशतके झळकावली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk pay tribute to suresh raina after he goes unsold at ipl auction 2022 adn