आयपीएल २०२१ स्पर्धेतील चेन्नईविरुद्धच्या प्लेऑफच्या सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉची बॅट चांगलीच तळपली. या सामन्यात विजयी संघाची अंतिम फेरीत धडक असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पृथ्वी शॉने आक्रमक फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येत वाढ केली. तसेच वैयक्तिक अर्धशतकही झळकावलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवव्या षटकात पृथ्वीने जडेजाला चौकार खेचत २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पृथ्वी शॉने ३४ चेंडूत ६० धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर उंच फटका मारल्यानंतर सीमारेषेवर फाफने त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. पृथ्वी शॉने आयपीएलमध्ये खेळलेल्या १५ सामन्यात ५२१ धावा केल्या आहेत. यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड

दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, टॉम करन, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नॉर्किया.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dc batter prithvi shaw made half century in ipl 2021 rmt