मुंबईच्या उदयन्मुख बिलियर्ड्सपटू ध्रुव सितवालने विश्वविजेत्या पंकज अडवाणीला पराभवाचा धक्का देत एसीबीएस आशियाई बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पध्रेचे जेतेपद पटकावले. ध्रुवने ६-३ अशा फरकाने अडवाणीचा पराभव करून पहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद आपल्या नावावर केले.
अडवाणी़, सी. प्राप्रुत आणि पीटर गिलख्रिस्ट हे विश्वविजेते खेळाडू स्पध्रेत असूनही मुंबईकर ध्रुवने एकहाती वर्चस्व गाजवले. गतविजेत्या सौरव कोठारीला थायलंडच्या
प्राप्रुतसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  
या विजयानंतर ध्रुव म्हणाला, ‘‘आता आकाशाला हात टेकल्यासारखे वाटत आहे. राष्ट्रीय बिलियर्ड्स स्पध्रेच्या अंतिम लढतीत अडवाणीने पराभव केला होता आणि तोच पराभव या अंतिम लढतीत माझ्यासमोर येत होता.’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhruv sitwala stuns pankaj advani to claim asian billiards title