दोन सामन्यांमध्ये तब्बल आठ गोल लगावत फ्रान्सचा संघ ‘इ’ गटमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे त्यांचे बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. पण दुसरीकडे इक्वेडोरच्या संघाला मात्र फ्रान्स्विरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. कारण त्यांनी हा सामना गमावल्यावर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
फ्रान्सने होंडुरासला ३-० असे पराभूत केले होते, त्यानंतर स्वित्र्झलडवर त्याने ५-२ असा धमाकेदार विजय मिळवला होता. त्यामुळे फ्रान्सचा संघ सहा गुणांनिशी अव्वल स्थानावर असून या सामन्यात पराभव झाल्यासही त्यांना उत्तम गोलफरकाच्या जोरावर बाद फेरीत पोहोचला येईल. पण गटामध्ये
अव्वल स्थान न पटकावता आल्यावर त्यांना बाद फेरीत अर्जेटिनाचा सामना करावा लागेल.
सामना क्र. ४२
‘इ’ गट : फ्रान्स वि. इक्वेडोर
स्थळ :   इस्टाडिओ माराकना, रिओ द जानिरो
वेळ :  मध्यरात्री १.३० वा. पासून

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ecuador going to face tough challenge of france