इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे खेळला जात आहे. पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदने आपला पदार्पण सामना खेळताना एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने आपल्या फिरकीने इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकात दम केला. ज्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव ५१.४ षटकांनंतर २८१ धावांवर गुंडळला गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानी गोलंदाज अहमद अबरारने दुसऱ्या सामन्यात आपल्या फिपकीने शानदार प्रदर्शन केले आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने सात विकेट्स घेतल्या आहेत. अबरारने सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, विल जॅक्स आणि बेन स्टोक्स यांना तंबूत धाडले आहे.

या शानदार गोलंदाजीमुळे उजव्या हाताचा लेगस्पिनर अबरार अहमदने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, २४ वर्षीय अबरार आपल्या कसोटी पदार्पणात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा पाकिस्तानचा केवळ १३वा गोलंदाज ठरला आहे. तसेच पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ७ विकेट्स घेणारा, तो तिसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. त्याच्या अगोदर मोहम्मद झाहिद आणि मोहम्मद नाझीरने पदार्पणात ७ विकेट्स घेतल्या होत्या. मुलतानमध्ये १६ वर्षांनंतर कसोटी सामन्याचे आयोजन केले जात आहे, अशा परिस्थितीत अबरार अहमदने हा सामना पाकिस्तानसाठी संस्मरणीय बनवला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात रावळपिंडीच्या खेळपट्टीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता मुलतान कसोटी सामन्यात फिरकीपटूंना मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही सामना सुरू होण्यापूर्वी मुलतानच्या विकेटची माहिती दिली होती. बाबर म्हणाला की, चेंडू वळेल अशी अपेक्षा होती आणि तसे घडले.

हेही वाचा – ENG vs PAK 2nd: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ

इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून बेन डकेटने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४९ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याचबरोबर ओली पोपनेदेखील ६१ चेंडूत ६० धावा केल्या. त्याचरोबर पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना, अबरार अहमदने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या. तसेच झाहिदने मेहमूदने ३ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs pak 2nd test abrar ahmed has become the third bowler of pakistan to take 7 wickets on his test debut vbm
First published on: 09-12-2022 at 15:58 IST