ग्रीसला सामाजिक आणि कलेची मोठी संस्कृती आहे. मात्र त्यांच्या देशातल्या फुटबॉलला मोठा वारसा नाही. त्यांचे खेळाडू युरोपातल्या क्लब स्पर्धामध्ये खेळतात. मात्र तरीही हा संघ सर्वसाधारण संघ म्हणून ओळखला जातो. मात्र महत्त्वाकांक्षा असेल तर इतिहास बदलता येतो, हे ग्रीसच्या उदाहरणाने स्पष्ट झाले आहे. ग्रीसने
अन्य लढतींमध्ये कोलंबियाच्या वाटचालीचा उल्लेख करावा लागेल. कोलंबियाच्या खेळाडूंकडे तांत्रिक कौशल्य नाही. त्यांच्या खेळामध्ये काही त्रुटीही जाणवतात. मात्र त्यांचे गोल करण्यातले सातत्य वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक सामन्यात त्यांच्या खेळाडूंनी गोल केले आहेत. विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर अनेक संघांना बरीच वर्षे गोलविरहित जातात. मात्र कोलंबियाने याबाबतीत सगळ्यांना पिछाडीवर टाकले आहे. जेम्स रॉड्रिग्स हा त्यांचा युवा खेळाडू चमकताना दिसतो आहे. युवा जेम्स पहिल्यांदाच विश्वचषकात खेळतो आहे. विश्वचषकाचे सामने अनेक क्लब्सचे व्यवस्थापक पाहत असतात. जागतिक स्तरावरचे युवा कौशल्य टिपण्याची ही नामी संधी असते. अशा व्यासपीठावर आपले कर्तृत्व सिद्ध करून मोठा व्यावसायिक करार पदरात पाडण्याची संधी जेम्सकडे आहे. आणि तो या संधीचे सोने करताना दिसत आहे. पुढच्या विश्वचषकापर्यंत बरेच काही बदलू शकते. त्यामुळे आता मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेत संघाच्या विजयात योगदान देण्याचा जेम्सचा प्रयत्न आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोलंबियाच्या संघाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. प्रत्येक सामन्याला चाहत्यांचा महासागर जमलेला असतो. खेळ थोडाही मंदावला की ते कोलंबियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देतात. असा पाठिंबा असेल तर खेळायला हुरूप येतो आणि हेच कोलंबियाच्या बाबतीत घडते आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2014 रोजी प्रकाशित
शाब्बास ग्रीस!
ग्रीसला सामाजिक आणि कलेची मोठी संस्कृती आहे. मात्र त्यांच्या देशातल्या फुटबॉलला मोठा वारसा नाही. त्यांचे खेळाडू युरोपातल्या क्लब स्पर्धामध्ये खेळतात.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 26-06-2014 at 05:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2014 excellent greece