‘फाईट ऑफ द सेंच्युरी’ अर्था बॉक्सिंगच्या महामुकाबल्यात अमेरिकेच्या फ्लॉईड मेवेदरनं बाजी मारली. मेवेदरने फिलिपिन्सच्या मॅनी पॅकियाओचा पराभव केला.
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये एमजीएम ग्रँड गार्डन अरेनात फिलिपाईन्सच्या मॅनी पॅकियाओ आणि अमेरिकेच्या फ्लॉइड मेवेदर या दोन वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर्समध्ये हा सामना झाला. मेयवेदरला ११४२ कोटी रुपये व पखियाओला ७६१ कोटी रुपये मिळाले. तसेच विजेत्याला ६.३४ कोटी रुपयांचा हिरेजडित बेल्ट मिळाला. मेवेदर जगातील सर्वाधिक कमाई करणारा बॉक्सर आहे. त्याची संपत्ती जवळपास २७ अब्ज रुपये आहे. तर त्याच्याशी भिडणारा पॅक्वेची कमाई २२ अब्ज इतकी आहे. आजवरच्या कारकीर्दीत ४८ लढतींमध्ये मेवेदर अजिंक्य राहिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2015 रोजी प्रकाशित
अमेरिकेचा फ्लॉईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग
'फाईट ऑफ द सेंच्युरी' अर्था बॉक्सिंगच्या महामुकाबल्यात अमेरिकेच्या फ्लॉईड मेवेदरनं बाजी मारली. मेवेदरने फिलिपिन्सच्या मॅनी पॅकियाओचा पराभव केला.

First published on: 03-05-2015 at 11:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Floyd mayweather vs manny pacquiao floyd mayweather beats manny pacquiao by unanimous decision to remain undefeated