देशाच्या फुटबॉल इतिहासात क्रांती घडवून आणणाऱ्या इंडियन सुपर लीगमध्ये परदेशी खेळाडूंचा सहभाग आहे. विश्वचषकापासून ते अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या या दिग्गज परदेशी खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा देशातील युवा फुटबॉलपटूंना होणार आहे. आयएसएलमुळे देशातील फुटबॉलला चालना मिळेल आणि भविष्यात भारताचा सक्षम संघ तयार होईल, अशी आशा इंडियन सुपर लीगमधील मुंबई सिटी एफसीचा खेळाडू अभिषेक यादव याने सांगितले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आणि फुटबॉल माईंडतर्फे पोर्टल तयार करण्यात आले असून हे पोर्टल म्हणजे महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांना जोडणारा दुवा ठरणार आहे. या पोर्टलवर ३२ जिल्ह्यांना स्वत:चे वेब पेज तयार करता येणार असून खेळाडूंना तसेच प्रशिक्षकांना आपली माहिती, फोटो, आगामी सामने याची नोंद या पोर्टलवर करता येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2014 रोजी प्रकाशित
परदेशी खेळाडूंचा देशातील युवा फुटबॉलपटूंना फायदा होईल -अभिषेक यादव
देशाच्या फुटबॉल इतिहासात क्रांती घडवून आणणाऱ्या इंडियन सुपर लीगमध्ये परदेशी खेळाडूंचा सहभाग आहे. विश्वचषकापासून ते अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या या दिग्गज परदेशी खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा देशातील युवा फुटबॉलपटूंना होणार आहे.
First published on: 08-10-2014 at 12:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign players participation isl benefit to young football player of country says abhishek yadav