बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारा खेळाडू व्हीलचेअरवर! माईक टायसनचे विमानतळावरील फोटो व्हायरल

माईक टायसन यांनी २००५ मध्ये केव्हिन मॅकब्राइडविरुद्धच्या लढतीनंतर निवृत्ती स्वीकारली होती.

बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारा खेळाडू व्हीलचेअरवर! माईक टायसनचे विमानतळावरील फोटो व्हायरल
फोटो सौजन्य – ट्विटर

कधीकाळी बॉक्सिंग रिंगमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवणारे दिग्गज खेळाडू माईक टायसन यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याचे निदर्शनास आले आहे. टायसन हे मियामी विमानतळावर व्हीलचेअरवर बसलेल्या अवस्थेत दिसले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साधारण एक महिन्यापूर्वी ‘हॉटबॉक्सिन’ नावाच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी आपली ‘एक्सपायरी डेट’ जवळ येत असल्याचे म्हटले होते. अशातच आता ते व्हीलचेअरवर बसल्याचे दिसल्याने त्यांची प्रकृती खालावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

माईक टायसन यांनी २००५ मध्ये केव्हिन मॅकब्राइडविरुद्धच्या लढतीनंतर निवृत्ती स्वीकारली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये रॉय जोन्स ज्युनियरविरुद्धच्या प्रदर्शनीय लढतीत त्यांनी रिंगमध्ये पुनरागमन केले होते. ही लढत अनिर्णित राहिली होती. पॉडकास्टच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कात होते. महिन्यापूर्वी झालेल्या पॉडकास्टमध्ये ५६ वर्षीय टायसन म्हणाले होते, “आपण सर्वजण एक दिवस नक्की मरणार आहोत. जेव्हा मी आरशात पाहतो आणि मला माझ्या चेहऱ्यावर छोटे डाग दिसतात. तेव्ही मी स्वत:लाच सांगतो, माझी जाण्याची वेळ जवळ येत आहे.”

त्याच पॉडकास्टमध्ये टायसन यांनी, आयुष्यात पैशाचे स्थान कितपत महत्त्वाचे आहे, याबाबत भाष्य केले होते. ते म्हणाले होते, “लोकांना वाटते की भरपूर पैसा त्यांना आनंदी करेल. मात्र, हे सत्य नाही. जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसा असतो, तेव्हा तुम्हाला खरे प्रेम मिळेलच असे नाही. पैसा असेल तर सुरक्षिततेची भावना मनामध्ये असते, असेही काहीजण म्हणतात. पण, माझ्या मते, पैसा तुम्हाला प्रत्येकवेळी सुरक्षितता देईलच, हे शक्य नाही.”

हेही वाचा – पत्नी धनश्रीला घटस्फोट दिल्याच्या चर्चांवर युजवेंद्र चहलने केलं भाष्य, म्हणाला…

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला टायसनने वादात सापडले होते. सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बसलेल्या प्रथम श्रेणीतील सहप्रवाशाला मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरला झाला होता. त्यापूर्वी, १९९०मध्येही बलात्काराच्या एका खटल्यामुळे टायसनची चर्चा झाली होती. मात्र, या खटल्यात ते निर्दोष आढळले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former heavyweight boxing champion mike tyson spotted in a wheelchair at miami airport vkk

Next Story
पत्नी धनश्रीला घटस्फोट दिल्याच्या चर्चांवर युजवेंद्र चहलने केलं भाष्य, म्हणाला…
फोटो गॅलरी