स्पर्धा म्हटली की शर्यत आलीच आणि खेळ म्हटल्यावर धोके हे आलेच. बुद्धिबळ, कॅरमसारख्या बैठय़ा खेळांचा अपवाद वगळला तर शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या अनेक खेळांमध्ये धोके हे आलेच. या धोक्यांमुळेच खेळाडूंना आपल्या प्राणाची बाजी लावावी लागते. फॉम्र्युला-वन हा सर्वाधिक धोके असणारा खेळ. सुरुवातीच्या काळात अनेक ड्रायव्हर्सचे प्राण फॉम्र्युला-वन या खेळाने घेतले आहेत, पण तरीही या
फॉम्र्युला-वनच्या पहिल्या दिवसापासूनच गंभीर अपघात आणि ड्रायव्हर्सचा मृत्यू अशा घटना घडू लागल्या. फक्त ड्रायव्हर्सच नव्हे तर सुरक्षारक्षक आणि चाहत्यांना प्राण गमवावे लागल्यानंतर या खेळात सुधारणेच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडून आले. १९९४मध्ये महान ड्रायव्हर्स आर्यटन सेन्नाच्या मृत्यूनंतर मात्र सुरक्षेच्या बाबतीत बऱ्याच सुधारणा घडून आल्या. मात्र प्रत्येक मोसमाच्या सुरुवातीला सुरक्षेचे नियम जसे बदलतात, तसतसा कारचा वेगही वाढत आहे. त्यामुळे कितीही सुरक्षा बाळगली तरी सुसाट वेगाने कार
शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारे खेळ हे खेळाडूंसाठी सुरक्षित आहेत का? फक्त फॉम्र्युला-वनच नव्हे तर अन्य खेळांतही प्राण गमवावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका येऊन किंवा चाहत्यांच्या मारहाणीत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. क्रिकेटसारख्या सुरक्षित खेळातही भारताच्या रमण लांबा यांना फॉरवर्ड शॉर्टलेगला क्षेत्ररक्षण करत असताना डोक्याला चेंडू लागून आपले प्राण गमवावे लागले होते. असे असताना मग फॉम्र्युला-वनमधील ड्रायव्हर्सच्या सुरक्षेच्या बाबतीतच का टाहो फोडला जात आहे.
२००९मध्ये फेरारीचा ड्रायव्हर फेलिपे मासाला गंभीर अपघाताला सामोरे जावे लागले होते. हेल्मेटच्या चिंधडय़ा झाल्यानंतरही मासा या अपघातातून बालंबाल बचावला होता. त्यानंतर त्याने दोन वर्षांतच फॉम्र्युला-वनमध्ये पुनरागमनही केले होते. सध्या विल्यम्स संघाकडून त्याची कामगिरीही चांगली होत आहे. पण बिआंची तितका सुदैवी ठरला नाही. अपघातानंतर डोक्याला जबर मार बसल्यामुळे बिआंची सात दिवसांनंतर अजूनही बेशुद्धावस्थेत आहे. त्याच्या तब्येतीत तसूभरही फरक पडलेला नाही. त्याच्या मेंदूला इजा झाल्याचे डॉक्टरांचे निदान असून तो पुन्हा नियमित आयुष्य जगण्याची शक्यता फारच कमी आहे. या आजारामुळे तो आयुष्यभरासाठी कोमात जाऊ शकतो. या आजारातून ९० टक्के रुग्ण बेशुद्धावस्थेतून बाहेर पडलेच नाहीत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे बिआंचीसारख्या उदयोन्मुख आणि युवा ड्रायव्हर्सची उणीव फॉम्र्युला-वनमध्ये नक्कीच जाणवेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
या अपघातामुळे रविवारी होणाऱ्या रशियन ग्रां. प्रि. शर्यतीवर टांगती तलवार असली तरी ‘शो मस्ट गो ऑन’ ही फॉम्र्युला-वनची परंपरा कायम राहणार आहे. या शर्यतीत बिआंचीच्या मॉरुसिया संघाने मात्र एकच कार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. फॉम्र्युला-वनमध्ये अपघातांची मालिका अशीच सुरू राहणार, की सुरक्षेच्या बाबतीत फॉम्र्युला-वन महासंघ यापुढेही मूग गिळून गप्प राहणार का, हा प्रश्न आता सर्वाना सतावत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2014 रोजी प्रकाशित
ही शर्य़त जीवघेणी!
स्पर्धा म्हटली की शर्यत आलीच आणि खेळ म्हटल्यावर धोके हे आलेच. बुद्धिबळ, कॅरमसारख्या बैठय़ा खेळांचा अपवाद वगळला तर शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या अनेक खेळांमध्ये धोके हे आलेच.

First published on: 12-10-2014 at 07:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Formula one a life taking competition