पॅरिस : जर्मनीचा अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि नॉर्वेचा कॅस्पर रूड यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत हे दोन खेळाडू आमनेसामने येतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२२व्या मानांकित झ्वेरेव्हने अर्जेटिनाच्या टॉमस मार्टिन एचावेरीवर ६-४, ३-६, ६-३, ६-४ असा विजय साकारत पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले. फ्रेंच टेनिस स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा त्याने उपांत्य फेरी गाठली आहे. दोन वर्षांपूर्वी झ्वेरेव्हला पाच सेटपर्यंत रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्टेफानोस त्सित्सिपासने नमवले होते. तर गेल्या वर्षी दुखापतीमुळे राफेल नदालविरुद्धचा सामना त्याला मध्यातच सोडावा लागला होता.

अन्य उपांत्यपूर्व सामन्यात, रूडने डेन्मार्कच्या सहाव्या मानांकित होल्गर रुनला ६-१, ६-२, ३-६, ६-३ असे नमवले.

अल्कराझ-जोकोव्हिच आज आमनेसामने

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला कार्लोस अल्कराझ आणि २२ ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोव्हिच फ्रेंच स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. ‘‘स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाली, तेव्हापासून सर्व जण या सामन्याची प्रतीक्षा करत होते,’’ असे अल्कराझ म्हणाला.

* वेळ : सायं. ६.१५ वा.

*थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २, ३ (संबंधित एचडी वाहिन्या)

अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French open 2023 casper ruud in semi final to play against alexander zverev zws