गॅरी बॅलन्स याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ३८९ धावांचे अधिक्य मिळवीत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आपली बाजू बळकट केली. विजयासाठी श्रीलंकेला शेवटच्या दिवशी ३९० धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या या सामन्यात गॅरी याने कसोटी कारकीर्दीतील पहिलेच शतक टोलविले हीच इंग्लंडच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट ठरली. इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८ बाद २६७ धावा करीत डाव घोषित केला. तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या २४ वर्षीय गॅरी याने नाबाद १०४ धावा केल्या. पहिल्या व मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर इंग्लंडची ६ बाद १२१ अशी स्थिती झाली होती. तथापि, गॅरी याने नवोदित खेळाडू ख्रिस जॉर्डन याच्या साथीत सातव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gary ballances first test ton gives england advantage