Glenn Maxwell injured while playing golf: भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ दरम्यान दुखापतींची समस्या सातत्याने वाढत आहे. अनेक संघांचे स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघही चिंतेत आहे. दरम्यान, पाचवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी मोठा झटका बसला आहे. नेदरलँडविरुद्ध ४० चेंडूत शतक झळकावणारा आणि त्यानंतर चालू विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध शानदार फलंदाजी करणारा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पुढील महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॅक्सवेल आठवडाभर क्रिकेटपासून राहणार दूर –

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. अव्वल चारमध्ये कायम राहण्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल. ग्लेन मॅक्सवेल या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर आहे. असे सांगण्यात येत आहे की मॅक्सवेल सोमवारी गोल्फ खेळत होता. यादरम्यान तो जखमी झाला. या दुखापतीमुळे मॅक्सवेल जवळपास ८ दिवस क्रिकेटपासून दूर राहू शकतो.

सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत नाही –

ईएसपीएन क्रिकइंफोच्या वृत्तानुसार, ग्लेन मॅक्सवेल सोमवारी क्लब हाऊसमध्ये गोल्फ खेळताना जखमी झाला. या दुखापतीमुळे तो ६ ते ८ दिवस क्रिकेटपासून दूर राहणार आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की, तो खेळाप्रती प्रामाणिक आहे आणि लवकरच परतेल. सुदैवाने दुखापत गंभीर नसल्याचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले. परिस्थिती आणखी बिघडली असती. यावेळी मुख्य प्रशिक्षकाने मॅक्सवेल केवळ एका सामन्यासाठी बाहेर बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा – World Cup 2023: “तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा…”: माजी पाकिस्तानी दिग्गज शाहिद आफ्रिदी पीसीबी प्रमुखांवर संतापला

गेल्या वर्षीही ग्लेन मॅक्सवेलला झाली होती दुखापत –

ग्लेन मॅक्सवेलला वर्ल्ड कपपूर्वीच दुखापत झाली होती. गेल्या वर्षी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत घसरल्याने त्याचा पाय मोडला होता. या दुखापतीमुळे मॅक्सवेल जवळपास पाच महिने मैदानापासून दूर राहिला होता. विश्वचषकापूर्वी भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत मॅक्सवेलने पुनरागमन केले. मॅक्सवेलला झालेल्या दुखापतीनंतर त्याच्या जागी मार्नस लाबुशेनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने ४० चेंडूत विक्रमी शतक झळकावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glenn maxwell injured while playing golf ahead of match against england in world cup 2023 vbm