Hardik Pandya Spotted With New Rumoured Girlfriend Video: हार्दिक पंड्या हा भारताच्या वनडे, टी-२० संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. मैदानावरील कामगिरीबरोबरच पंड्या हा त्याच्या मैदानाबाहेरील गोष्टींमुळे आणि वैयक्तिक जीवनातील घडामोडींमुळे चर्चेत असतो. नुकत्याच झालेल्या आशिया चषकात हार्दिक पंड्या त्याच्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेचा विषय होता. पण आता हार्दिक एअरपोर्टला त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबरोबर दिसला आहे, ज्याचे व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहेत.
अलिकडेच, पंड्याने ४.५ कोटी किमतीची एक नवीन लॅम्बोर्गिनी देखील खरेदी केली आणि तो त्याच्या नवीन कारमधून गर्लफ्रेंडसह उतरला. दरम्यान एअरपोर्टपर्यंत पंड्या स्वत: कार चालवत आला होता. पण ही हार्दिक पंड्याची नवी गर्लफ्रेंड कोण आहे, जाणून घ्या.
हार्दिक पंड्या आणि माहिका शर्मा आज एका नव्या व्हीडिओमध्ये नुकतेच एकत्र समोर आले. या दोघांचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हार्दिकच्या या व्हीडिओमध्ये त्याची नवी कार दिसत आहे. हार्दिक सुरूवातीला या कारमधून उतरतो आणि नंतर माहिका शर्मा उतरते. यानंतर ती उतरून तातडीने हार्दिकच्या दिशेने जाते आणि त्याचा हात पकडू पाहते, पण लगेच पुढे जाते. मग हार्दिक व ती एअरपोर्टच्या दिशेने जातात.
कोण आहे हार्दिक पंड्याची नवी गर्लफ्रेंड?
हार्दिक पंड्याची नवीन गर्लफ्रेंड मूळची दिल्लीची आहे आणि तिची संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे. हार्दिक पंड्याचं दिल्लीच्या मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा काही दिवासांपूर्वीच आल्या होत्या, जिचं नाव माहिका शर्मा आहे. माहिका पेशाने मॉडेल आहे आणि इन्स्टाग्रामवरदेखील तिचे बरेचसे फॉलोअर्स आहेत. महिकाने तिचे शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं आणि नंतर अर्थशास्त्र आणि फायनान्स या विषयात पदवी मिळवली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकची नवीन गर्लफ्रेंड, महिका शर्मा हिची एकूण संपत्ती ३.२ कोटी आहे. नताशा स्टॅन्कोविकशी घटस्फोट घेतल्यानंतर, हार्दिक पंड्या ब्रिटिश गायिका जास्मिन वालियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती.
आयपीएल २०२५च्या दरम्यान अनेकदा ती मुंबई इंडियन्सचे सामने पाहण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये उपस्थित होती. इतकंच नव्हे तर ती मुंबई इंडियन्सच्या टीम बसने देखील प्रवास करतान दिसली आहे. ज्यामध्ये खेळाडूंचे कुटुंबीय एकत्र असतात. पण अचानक हार्दिक माहिका शर्माबरोबर दिसल्याने या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं.