आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीची लढत कोलकाता आणि चेन्नई या दोन संघात होणार आहे. चेन्नईचा संघ नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला असून तीन वेळा चषकावर नाव कोरलं आहे. तर कोलकात्याचा संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला असून दोन वेळा चषक आपल्या नावावर केला आहे. यानंतर क्रिकेट समालोचक आणि समीक्षक हर्षा भोगले यांनी कर्णधार कसा असावा?, यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“रोहित शर्मा, एमएस धोनी, गौतम गंभीर, डेव्हिड वॉर्नर आणि आता अंतिम फेरीत इयोन मॉर्गन..अव्वल कर्णधार असण्याची मूल्य दर्शवित आहेत. मी पुन्हा सांगेन फ्रेंचायझी टी २० क्रिकेट, एक चांगला कर्णधार जवळजवळ दोन खेळाडूंच्या किंमतींचा असतो”, असं ट्वीट हर्षा भोगले यांनी केलं आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ५ वेळा आयपीएल चषकावर आपलं नाव कोरलं आहे. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षात किताब आपल्या नावावर केला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने ३ वेळा किताब जिंकला आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. तर डेविड वॉर्नर ( सनराइजर्स हैदराबाद), एडम गिलख्रिस्ट (डेक्कन चार्जस), शेन वॉर्न (राजस्थान रॉयल्स) यांनी प्रत्येकी एक वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harsha bhogle on ipl captaincy rmt