हॉकीतील गेलेले वैभव पुन्हा मिळविण्यासाठी हॉकी इंडियाने कंबर कसली आहे. खेळाचा ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी त्यांनी सरचिटणीस नरेंद्र बात्रा यांच्या अध्यक्षतेखाली उच्च कामगिरी व विकास समिती स्थापन केली आहे.
ऑलिम्पिकपटू अजितपालसिंग, बलबीरसिंग यांच्यासह पंधरा सदस्यांच्या या समितीचे उपाध्यक्षपद हॉकी इंडियाचे उच्च कामगिरी संचालक रोलँन्ट ओल्टमन्स यांच्याकडे देण्यात आले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणास या समितीचे निमंत्रित सदस्यत्व देण्यात आले आहे.
समिती-नरेंद्र बात्रा (अध्यक्ष), रोलँन्ट ओल्टमन्स (उपाध्यक्ष), एलिना नॉर्मन (समन्वयक), अजितपालसिंग, बलबीरसिंग, दिलीप तिर्की, सुखवीरसिंग ग्रेवाल, थोईबासिंग, मुकेशकुमार, डॉ.आर.पी.सिंग, सुरिंदर कौर, साबा अंजुम. मायकेल नॉब्स, नील हॉवगुड, ग्रेग क्लार्क.