वरिष्ठ गटाची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा २८ मेपासून पुण्यात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत देशातील ३८ संघांमधून अनेक ऑलिम्पिकपटू भाग घेत आहेत. शिवछत्रपती क्रीडानगरी व पिंपरी चिंचवड पॉलिग्रास मैदान या दोन ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेत ६८४ खेळाडू व २२० तांत्रिक अधिकारी भाग घेत आहेत. स्पर्धेतील सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहेत. प्रत्येक गटातील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे. संघांची विभागणी पुढीलप्रमाणे-‘अ’ गट- पंजाब, दिल्ली, गुजरात, अरुणाचल, संयुक्त विद्यापीठ संघ. ‘ब’ गट- एअर इंडिया, मध्यप्रदेश, त्रपुरा, छत्तीसगड, पुडुचेरी. ‘क’ गट-कर्नाटक, सेनादल, बिहार, भारतीय क्रीडा प्राधिकरण, गोवा. ‘ड’ गट-महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, हरियाणा, अंदमान व निकोबार, मुंबई. ‘इ’ गट- झारखंड, ओरिसा, हिमाचल प्रदेश, बंगाल, लेखापाल नियंत्रक इलेव्हन. ‘एफ’ गट- रेल्वे, भोपाळ, सशस्त्र सीमा दल, जम्मू-काश्मीर, नामधारी इलेव्हन. ‘जी’ गट- मणिपूर, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, केरळ. ‘एच’ गट-तामिळनाडू, चंडीगढ, आसाम, राजस्थान.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पिंपरी चिंचवड पॉलिग्रास मैदानावर राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी व हाय परफॉर्मन्स विभागाचे संचालक रोलॅन्ट ऑल्तोमास यांच्या हस्ते होणार आहे. कुर्ग स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेतील सामने सकाळ व दुपारच्या सत्रात होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय हॉकी स्पर्धा २८ मेपासून पुण्यात
वरिष्ठ गटाची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा २८ मेपासून पुण्यात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत देशातील ३८ संघांमधून अनेक ऑलिम्पिकपटू भाग घेत आहेत. शिवछत्रपती क्रीडानगरी व पिंपरी चिंचवड पॉलिग्रास मैदान या दोन ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेत ६८४ खेळाडू व २२० तांत्रिक अधिकारी भाग घेत आहेत. स्पर्धेतील सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहेत.
First published on: 25-05-2013 at 01:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey india national championships in pune from may