काही दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती पत्करल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संक्रमण अवस्थेतून जात आहे. श्रीलंकेचा संघही संक्रमणाच्या उंबरठय़ावर आहे. परंतु ट्वेन्टी-२० विश्वचषक अभियानाची विजयानिशी सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.
ऑस्ट्रेलियाने नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेला २-० असे हरवले होते. या मालिकेत काही विशिष्ट खेळाडूंवरच दक्षिण आफ्रिकेची कामगिरी अवलंबून असते. परंतु श्रीलंकेची स्थिती निराळी आहे. त्यांच्याकडे ट्वेन्टी-२० हा प्रकार आत्मसात केलेले अनेक खेळाडू आहेत.
संघ
दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), ए बी डी व्हिलियर्स (यष्टीरक्षक), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), हशिम अमला, डेल स्टेन, लोनवाबो त्सोत्सोबे, ब्यूरान हेंड्रिक, आरोन फांगिसो, इम्रान ताहिर, अ‍ॅल्बी मॉर्केल, मॉर्ने मॉर्केल, फरहान बेहरदीन, जे पी डय़ुमिनी, डेव्हिड मिलर, वेन पार्नेल.
श्रीलंका : दिनेश चंडिमल (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, रंगना हेराथ, महेला जयवर्धने, न्यूवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, अजंथा मेंडिस, कुसल परेरा, थिसारा परेरा, सीक्क्युगे प्रसन्ना, कुमार संगकारा, सचित्र सेनानायके, लाहिरू थिरिमाने.