आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना भारताने रविवारी बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा ७३ धावांनी पराभव केला आणि समस्त भारतवासीयांना गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला विजयाची भेट दिली. दुसऱ्या गटातून उपांत्य फेरीत आधीच स्थान निश्चित करणाऱ्या भारताने अव्वल-१० फेरीमध्ये चारपैकी चार लढती जिंकण्याची किमया साधली.
फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रांतांमध्ये भारताची कामगिरी ऑस्ट्रेलियापेक्षा सरस झाली. डेव्हिड वॉर्नर (१९), ग्लेन मॅक्सवेल (२३) वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर दीर्घकाळ टिकाव धरता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ७ बाद १५९ (युवराज सिंग ६०, महेंद्रसिंग धोनी २४; ब्रॅड हॉज १/१३) विजयी वि. ऑस्ट्रेलिया : १६.२ षटकांत सर्व बाद ८६ (ग्लेन मॅक्सवेल २३, डेव्हिड वॉर्नर १९; आर. अश्विन ४/१९, अमित मिश्रा २/१३)
सामनावीर : आर. अश्विन.
आर. अश्विन: ३.२-०-११-४
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2014 रोजी प्रकाशित
फिरकीची गुढी उंच!
आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना भारताने रविवारी बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा ७३ धावांनी पराभव केला
First published on: 31-03-2014 at 12:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc world twenty20 yuvraj singh ashwin make it