Sam Konstas Century: ऑस्ट्रेलिया अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन्ही संघांमध्ये पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरूवात केली आहे. सॅम कॉन्टास आणि कँपबेल यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिवशी ३३७ धावा केल्या आहेत. सॅम कॉन्टास आणि कँपबेल केलावेने यांनी सलामीला फलंदाजी करताना १९८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान सॅम कॉन्टासने १०९ धावांची खेळी केली.
भारतीय संघाविरूद्ध खेळताना आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या सॅम कॉन्टासने पहिल्याच सामन्यात दमदार खेळ करत शतक पूर्ण केलं. त्याला साथ देत केलावेने ९७ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ८८ धावांची खेळी केली. या जोडीने भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज प्रसिद कृष्णाची चांगलीच धुलाई केली. या जोडीने केलेल्या भागीदारीच्या बळावर ऑस्ट्रेलिया अ संघाने ३८ व्या षटकात २०० धावांचा पल्ला गाठला. मात्र ही जोडी फुटल्यानंतर फलंदाजीला आलेला मॅकस्वीनी स्वस्तात माघारी परतला.
या सामन्यातील पहिल्या दिवशी फलंदाजी करताना सॅम कॉन्टासने १०९ धावांची खेळी केली. त्याला हर्ष दुबेने बाद करत माघारी धाडलं. कँपबेल केलावेने ९७ चेंडूंचा सामना करत ८८ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार मॅकस्वीनी केवळ १ धाव करून माघारी परतला. तर ऑलिवर पीकने २ धावा केल्या. कोनोलीने ७० धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत लियाम स्कॉट नाबाद ४७ धावांवर नाबाद आहे. तर जोश फिलिप ३ धावांवर नाबाद आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारतीय अ संघ: अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, एन. जगदीशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), तनुष कोटियन, हर्ष दुबे, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, गुर्नूर ब्रार
ऑस्ट्रेलिया अ संघ: सॅम कॉन्टास, कँपबेल केलावे, नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), ऑलिवहर पीक, जोश फिलिप (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, लिआम स्कॉट, झेव्हियर बार्टलेट, फर्गस ओ’नील, कोरी रोकिचिओली, टॉड मर्फी