भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

१९७५ मध्ये विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली. त्या सुमारास क्रिकेटला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती असे मानले जाते. विश्वचषक स्पर्धेमुळे क्रिकेटच्या लोकप्रियता वाढत गेली. तो काळ वेस्ट इंडिजच्या संघाने गाजवला. कालांतराने क्रिकेट विश्वामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपला दबदबा निर्माण केला होता. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाने अनोखा विक्रम केला आहे. या संघाने सलग ५ वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तसेच त्यांनी टी-२० विश्वचषकावरही आपले नाव कोरले आहे. २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी भारताचा पराभव केला होता. फार आधीपासून ऑस्ट्रेलिया हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो. ऑस्ट्रेलियालाही भारत नेहमी आव्हान देत असतो.


भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)यांच्यामध्ये वैर नसले तरी ते क्रिकेटच्या सामन्यामध्ये नेहमी दुसऱ्यावर वरचढ राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या २०२३ विश्वचषक सुरु आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होता. या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. हे दोन्ही संघ १३ वेळा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाला ८ वेळा यश मिळाले आहे. तर भारताने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटच्या १४९ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने ८३ सामने जिंकले आहेत. तर भारताने ५६ सामन्यात बाजी मारली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चढाओढ खऱ्या अर्थाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या गाबा कसोटीमध्ये पाहायला मिळाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी मिळून १०७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४५ सामने ऑस्ट्रेलियाने, तर ३२ सामने भारताने जिंकले आहेत. तसेच २९ सामने अनिर्णीत राहिले आहेत.


Read More
Jasprit Bumrah Frustrate Over Ball Not Swinging in IND vs AUS Gabba Test Stump Mic Video Goes Viral
IND vs AUS: ‘स्विंग होत नाहीय…’, बुमराह गाबा कसोटीच्या पहिल्या दिवशी वैतागला; रोहित शर्माचा नाणेफेकीचा निर्णय चुकला? पाहा VIDEO

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला. पहिल्या दिवशी फक्त १३.२ षटकांचा सामना खेळवण्यात आला,…

IND vs AUS Gabba Test Start Time Changes for Last 4 Days Announces BCCI
IND vs AUS: गाबा कसोटीच्या अखेरच्या ४ दिवसांची वेळ बदलली, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

IND vs AUS Gabba Test Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे १३ षटकांचा सामना खेळवण्यात…

Rohit Sharm Trolled for Bowling First in IND vs AUS 3rd Test in Brisbane
IND vs AUS: रोहित शर्मावर गाबा कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यामुळे का होतेय टीका?

IND vs AUS: पर्थ आणि ॲडलेडनंतर आता टीम इंडियाचा सामना ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना होत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधाराने नाणेफेक…

Virat Khili 100th International Match Against Australia 2nd Player After Sachin Tendulkar IND vs AUS
IND vs AUS: विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियाविरूद्ध अनोखं ‘शतक’, सचिन तेंडुलकरनंतर ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा फक्त दुसरा खेळाडू

Virat Kohli IND vs AUS test: विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत खेळत आहे. तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरताच विराटने अनोख…

India Playing XI Announced for IND vs AUS 2nd Test 2 Changes Ravindra Jadeja and Akashdeep
IND vs AUS: गाबा कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जाहीर, संघात २ मोठे बदल; हर्षित राणा-अश्विन…

भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आहे. या कसोटीसाठी टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाने यशस्वी जैस्वालला हॉटेलमध्येच सोडले. कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर संतापला…

IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?

IND vs AUS Brisbane Weather Update: भारत-ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन गाबा येथे खेळवला जाणार आहे. पण या सामन्यात पाऊस…

Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज

Smriti Mandhana: पर्थ येथे झालेल्या तिसऱ्या वनडेत भारतीय महिला सलामीवीर स्मृती मानधनाने २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार शतक झळकावले.…

INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज

INDW vs AUSW: भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात…

IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य

सिराज आणि हेडच्या वादावर भारताचे माजी दिग्गज खेळाडू एस श्रीकांत यांनी सिराजला फार तिखट शब्दात सुनावलं आहे.

Mohammed Siraj Travis Head May Face ICC Disciplinary Action After Heated Argument
Siraj-Head Fight: सिराज-हेडला भर मैदानात वाद घालणं पडणार महागात, ICC कारवाई करण्याच्या तयारीत

Siraj-Head Fight Update: मोहम्मद सिराजचा मार्नस लबुशेननंतर ॲडलेड कसोटीत ट्रॅव्हिस हेडबरोबरही वाद झाला. आयसीसीने या प्रकरणाची दखल घेतली असून आता…

Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियात विजय मिळवायचा झाल्यास तुम्हाला मोठी धावसंख्या उभारण्यावाचून पर्याय नाही. मात्र, फलंदाज म्हणून आम्ही कमी पडलो.

संबंधित बातम्या