IND vs AUS 5th Test Who is Beau Webster : भारताविरुद्ध सिडनी येथे झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून जिंकला. यासह त्याने मालिका ३-१ अशी खिशात घातली. कांगारू संघाला १० वर्षांनंतर भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यात यश आले आहे. २०१४-१५ नंतर त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. या विजयात पदार्पणवीर ब्यू वेबस्टरने महत्त्वाचे योगदान दिले. त्याला मिचेल मार्शच्या जागी संधी देण्यात आली होती. तो कोण आहे? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलिया संघात त्याला शेवटच्या म्हणजे पाचव्या कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. त्याने या साम्यातील दोन्ही डावात शानदार फलंदाजी केली. पहिल्या डावात १०५ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याच्याच बॅटमधून विजयी चौकार आला. या डावात ३४ चेंडूंचा सामना करताना ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ३९ धावा केल्या. या मालिकेत इतर ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे संघर्ष करत असताना तो सहज फलंदाजी करताना दिसला. यासह त्याने या सामन्यात एक विकेटही घेतली होती.

कोण आहे ब्यू वेबस्टर?

१ डिसेंबर १९९३ रोजी होबार्ट, तस्मानिया येथे जन्मलेला, ब्यू वेबस्टर हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो ६ फुट आणि ७ इंच उंच खेळाडू आहे. जो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतही महत्त्वाची भूमिका निभवण्यासाठी ओळखला जातो. तसेच, तो मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तो देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. तस्मानियासाठी एक विश्वासार्ह व्यक्ती आणि बिग बॅश लीग (BBL) मध्ये एक विश्वासार्ह खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

हेही वाचा – IND vs AUS : ‘तुम्ही तुमच्या शरीराशी …’, पराभवानंतर दुखापतीबद्दल बोलताना जसप्रीत बुमराहने व्यक्त केली खंत

देशांतर्गत कारकीर्द आणि बिग बॅश लीग –

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा वेबस्टर हा तस्मानियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याची अष्टपैलुत्व बिग बॅश लीगमधील त्याच्या भूमिकेने अधिक ठळक केली आहे, जिथे तो मेलबर्न स्टार्सकडून खेळतो. उजव्या हाताचा फलंदाज म्हणून, तो आपल्या खेळाला वेगवेगळ्या सामन्यांच्या परिस्थितीशी जुळवून घेतो, मग तो डावाची सुरुवात असो किंवा टी-२० मध्ये जोरदार फिनिशिंग असो. याव्यतिरिक्त, वेबस्टर उजव्या हाताचा ऑफस्पिन गोलंदाज आहे, जो टी-२० क्रिकेटमध्ये उपयुक्त पर्याय आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 5th test who is debutante beau webster at sydney