IND vs AUS Finals Highlight Trophy Ceremony Rohit Sharma Dinesh Kartik Chemistry Virat Kohli Axar Patel | Loksatta

IND vs AUS Finals Highlight: अक्षर पटेल सामनावीर पण रोहितने विजयी ट्रॉफी ‘या’ खेळाडूला दिली, पाहा Video

IND vs AUS Finals Highlight: भारताने तिसऱ्या आणि निर्णायक T-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी आणि एक चेंडू राखून सरशी साधली.

IND vs AUS Finals Highlight: अक्षर पटेल सामनावीर पण रोहितने विजयी ट्रॉफी ‘या’ खेळाडूला दिली, पाहा Video
IND vs AUS Finals Highlight (फोटो: ट्विटर )

IND vs AUS Final Match Highlight: सूर्यकुमार यादव (३६ चेंडूंत ६९ धावा) आणि विराट कोहली (४८ चेंडूंत ६३) यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि निर्णायक T-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी आणि एक चेंडू राखून सरशी साधली. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या संपूर्ण T20I मालिकेत कमाल केमिस्ट्री दिसून आली. अगदी आधी मोहाली येथील पहिल्या सामन्यात रोहितने कार्तिकचा गळा धरण्यापासून ते अंतिम सामन्यात रोहितने कार्तिकचे कौतुक करून किस करण्यापर्यंत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नागपूर येथील दुसऱ्या गेममध्येसुद्धा रोहित तुफान बॅटिंग करताना नॉन स्ट्रायकरवर असलेल्या दिनेश कार्तिकचे कौतुक करण्यास विसरला नाही. इतकेच नव्हे तर कालच्या विजयानंतरही रोहितने केलेली एक कृती त्याच्या व दिनेश कार्तिकच्या मैत्रीची साक्ष देते.

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची मालिका २-१ अशी फरकाने जिंकली. यानंतर रोहितने संघासह फोटो काढताना विजयी ट्रॉफी कार्तिकच्या हाती दिली. रोहित सामन्यानंतरच्या सादरीकरणात म्हणाला की, संघातील वेगवेगळ्या खेळाडूंनी पुढे जाणे, प्रगती करणे एक संघ म्हणून सर्वांच्या हिताचे असते. T20 मध्ये आम्ही सुधारणेच्या प्रत्येक संधीचा वापर केला आहे अजूनही बरीच सुधारणा होणे बाकी आहे. पण एका तगड्या संघाविरुद्ध विश्रांतीनंतर पुनरागमन करणे सोपे नाही.”

Deepti Sharma Controversy: तेंडुलकर ‘लकी’ होता नाहीतर त्याला… टीका होताच स्टुअर्ट ब्रॉड भडकला, पाहा पूर्ण चॅट

.. अन रोहित शर्माने ट्रॉफी उचलली

ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध या विजयासह भारताने एका वर्षात T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम मोडला आहे. रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या T20I मधील विजय हा भारताचा २०२२ मधील T20I मधील २१ वा विजय होता. मागील विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर होता, ज्याने २०२१ मध्ये २० T20I सामने जिंकले होते. भारताने या वर्षी मायदेशात १० T20I सामने जिंकले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Viral Video: पंड्याने विजयी चौकार लगावल्यानंतर पायऱ्यांवर बसून सामना पाहणाऱ्या विराट आणि रोहितने काय केलं पाहिलं का?

संबंधित बातम्या

अपराजित्व राखण्यात ब्राझील अपयशी; सर्बियाचा बचाव भेदत स्वित्झर्लंड बाद फेरीत
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
सलामीला शिखर धवन की केएल राहुल?
विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये मोरोक्को, जपान बलाढ्य युरोपिय देशांपुढे आपापल्या गटांत अव्वल कसे राहिले?
IND vs BAN: न्यूझीलंडहून परतणारे टीम इंडियाचे खेळाडू खराब व्यवस्थेचे बळी; दीपक चहरने केली तक्रार, जाणून घ्या प्रकरण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
“त्याच्या चाळीतल्या…” समीर चौगुलेंनी दत्तू मोरेच्या चाळीबद्दल केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य
“माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट
पुणे: ३६ व्या आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धा; इथिओपियाच्या स्पर्धकांनी मारली बाजी