IND vs ENG 5th Test : समालोचन करताना घसरली सेहवागची जीभ; दिग्गज खेळाडूला म्हणाला ‘छमिया’

सेहवागने त्याच्या भाषेवर जरा लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला क्रिकेट चाहत्यांनी दिला आहे.

Virender Sehwag
फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

भारत आणि इंग्लंडदम्यान सुरू असलेल्या कसोटी सामना मैदानाबरोबरच मैदानाबाहेरील घडामोडींसाठी देखील चर्चेत आला आहे. दोन्ही देशांच्या माजी खेळाडूंनी या सामन्याबाबत जोरदार प्रतिक्रिया देण्याचा धडाका सुरू केला आहे. सोशल मीडियावर या प्रतिक्रियांची मोठ्या प्रमाणात चर्चादेखील सुरू आहे. दरम्यान, माजी भारतीय खेळाडू विरेंद्र सेहवागने विराट कोहलीवर केलेली एक टिप्पणी क्रिकेट चाहत्यांना अजिबात रुचलेली नाही. त्यांनी विरेंद्र सेहवागला ट्रोल केले आहे.

इंग्लंडचा डाव सुरू असताना ६०व्या षटकात मोहम्मद सिराजने सॅम बिलिंग्जला त्रिफळाचित केले. यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या कोहलीने नाचून आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. यावर हिंदी समालोचन करत असलेला मोहम्मद कैफ सेहवागला म्हणाला, ‘विराट कोहलीचा डान्स बघ’. यावर सेहवागने कोहलीची खिल्ली उडवली. तो म्हणाला, “छमिया डान्स करत आहे”. सेहवागचा आवाज असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

सेहवागने विराट कोहलीला ‘छमिया’ म्हटलेलं क्रिकेट चाहत्यांना अजिबात आवडले नाही. सोशल मीडियावर चाहत्यांनी सेहवागला चांगलेच फटकारले आहे. सेहवागने त्याच्या भाषेवर जरा लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला क्रिकेट चाहत्यांनी दिला आहे.

हेही वाचा – ‘ही तर माझी किमया’, बायकोने लुटले नवऱ्याच्या कामगिरीचे श्रेय!

यापूर्वी, विरेंद्र सेहवागने विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो वादाबाबत ट्वीट करूनही विराटच्या चाहत्यांचा रोष ओढावून घेतला होता. ‘विराट कोहलीने स्लेजिंग करण्यापूर्वी बेअरस्टोचा स्ट्राईक रेट २१ होता, स्लेजिंगनंतर तो १५० झाला. बेअरस्टो पुजारासारखा सावकाश खेळत होता. त्याच्यासोबत वाद घालून कोहलीने त्याला पंतप्रमाणे फटकेबाजी करण्यास प्रवृत्त केले,’ अशा आशयाचे ट्वीट विरेंद्र सेहवागने केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs eng test virender sehwag gets troll as he used bad words for virat kohli on field dance vkk

Next Story
‘ही तर माझी किमया’, बायकोने लुटले नवऱ्याच्या कामगिरीचे श्रेय!
फोटो गॅलरी