रोहित शर्माच्या टीम इंडियाने हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या ३ वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकला. पण सामन्याचे फासे कोणत्याही बाजूला फिरू शकले असते. कारण न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने संपूर्ण भारतीय संघ आणि त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर चिंता निर्माण केली होते. ३५० धावा करूनही भारताने हैदराबाद वनडे १२ धावांनी जिंकली. क्रिकेटमध्ये शेवटी फक्त निकाल महत्त्वाचा असतो आणि तो टीम इंडियाच्या बाजूने लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

\भारताच्या या विजयात शुभमन गिलचे द्विशतक महत्त्वाचे होतेच, पण मोहम्मद सिराजचे योगदानही तितकेच महत्त्वाचे ठरले. त्याने आपल्या घरच्या मैदानावर अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने केवळ शानदार गोलंदाजीच केली नाही, तर महत्वाच्या वेळी ४ विकेट्स घेत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करुन दिले.

लोकल बॉय सिराजने गोलंदाजीत आपली ताकद दाखवली नसती तर न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने (१४०) न्यूझीलंडला विजय मिळवून दिला असता. मात्र सामन्यापूर्वी सिराजकडे ते शस्त्र मिळाले होते, ज्याच्या जोरावर त्याने हैदराबादमध्ये संकटात अडकलेल्या संघाला वाचवण्याचे काम केले. खरे तर ते शस्त्र म्हणजे आई शबाना बेगम यांचा आशीर्वाद होता. सिराजने सामन्यापूर्वी संघाच्या सराव सत्रातही सहभाग घेतला नव्हता. तो मित्र आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेला होता. असे असतानाही तो जेव्हा मैदानात उतरला तेव्हा किवीज फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला.

हेही वाचा – IND vs NZ: सामन्यापूर्वी रोज शुबमनला इशान किशनला शिव्या का द्याव्या लागतात? रोहित शर्मासोबतच्या चर्चेचा VIDEO होतोय व्हायरल

सिराजची आई आणि बहिणीने स्टेडियममध्ये बसून सामना पाहिला –

सिराजची आई, बहीण आणि जवळचे मित्रही आपल्या सिराजला घरच्या मैदानावर खेळताना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. आई आणि बहिणीसाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता. जेव्हा-जेव्हा सिराज गोलंदाजी करायला यायचा, तेव्हा स्टेडियममध्ये त्याचे नाव घुमू लागायचे. कोणत्याही आईसाठी ही अभिमानाची बाब आहे. सिराजच्या आईचेही डोळे तिला आपल्या मुलासाठी मिळत असलेल्या प्रेमाने भरून आले होते.

हेही वाचा – IND vs NZ 1st ODI: मायकेल ब्रेसवेलने वादळी शतक झळकावताना धोनीच्या ‘या’ विश्वविक्रमाची केली बरोबरी

सिराजने मला सामन्यापूर्वी प्रार्थना करण्यास सांगितले: आई

सिराजची आई शबाना बेगम यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ”सोमवारी सिराज अचानक टीम हॉटेलमधून घरी आला. त्यावेळी मी नमाज अदा करत होते. मी डोळे उघडले तेव्हा माझा मियाँ समोर उभा होता. पहिल्यांदा मला धक्काच बसला की, तो मंगळवारी येईल असे त्याने सांगितले होते. आम्ही त्याच्यासाठी काही खास पदार्थ तयार केले नव्हते. म्हणूनच आधी मी त्याला या सरप्राईजसाठी खडसावले. मी म्हणाले तू अचानक आलास. मी तुझ्यासाठी काही खास बनवू शकले नाही. मला आठवतं, माझ्या ओरडण्यानंतर तो म्हणाला, तुमचा आशीर्वाद द्या, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. मी घाईघाईत त्याच्या आवडतची खिचडी बनवली.”

सिराजने सामन्यात ४ विकेट घेतल्या –

आता आईच्या आशीर्वादाचा प्रभाव म्हणा की, आणखी काही मोहम्मद सिराजने पहिल्याच स्पेलमध्ये न्यूझीलंडला मोठा धक्का दिला होता. त्याने डेव्हॉन कॉनवेच्या रुपाने पहिली विकेट घेतली. एकूणच सिराजने १० षटके गोलंदाजी करताना ४६ धावा दिल्या आणि ४ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, त्याची आई स्टेडियमच्या कॉर्पोरेट बॉक्समध्ये बसून त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. हेच सिराजनेदेखील त्याच्या आईकडे मागितले होते. कदाचित आईच्या प्रार्थनेचा परिणाम सिराजने पुन्हा एकदा सिद्ध केला की तो टीम इंडियासाठी अमूल्य का आहे. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीमुळे भारताला न्यूझीलंडविरुद्ध १२ धावांनी विजय मिळवता आला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 1st odi mohammad siraj had sought blessings from his mother before the match he shone on his own vbm