Asia Cup 2025 IND vs PAK Super 4 match: आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्याती सामना मोठा चर्चेचा विषय ठरला. भारताच्या खेळाडूंनी गट टप्प्यातील पाकिस्तानविरूद्ध सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंसह सामन्यानंतर हस्तांदोलन केलं नाही, याशिवाय कर्णधार सूर्यकुमारने नाणेफेकीदरम्यानही कर्णधाराशी हात मिळवला नाही. हे प्रकरण इतकं चर्चेत आलं की मॅच रेफरीविरूद्ध थेट आयसीसीपर्यंत तक्रार गेली. या सर्व प्रकरणानंतर आता भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आशिया चषकात भिडताना दिसणार आहेत.

भारतीय संघाने सामन्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानने स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली. ज्यामुळे युएई-पाकिस्तान सामना सुरू होण्यास विलंब झाला. पण अखेरीस युएईविरूद्ध कडवी झुंज दिल्यानंतर पाकिस्तानने या सामन्यात विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानचा संघ सुपर फोरमध्ये पोहोचला आहे.

भारत-पाकिस्तानमधील सुपर फोरमधील सामना किती तारखेला होणार?

आशिया चषक २०२५ च्या अ गटात भारत आणि पाकिस्तानसह युएई व ओमान हे संघ होत. यापैकी भारत आणि पाकिस्तानचे संघ गट टप्प्यातील दोन विजयांसह सुपर फोरसाठी पात्र ठरले. यासह दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ आता येत्या २१ सप्टेंबरला म्हणजेच रविवारी पुन्हा एकदा भिडताना दिसणार आहेत. हा सामना दुबईतील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. गट टप्प्यातील सामन्यांप्रमाणेच हा सामनादेखील रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.

पाकिस्तानचा संघ युएईविरूद्ध सामन्यात मोठी कडवी झुंज देत सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत गट टप्प्यात दोन सामने खेळले आहेत आणि हे दोन्ही सामने सहज जिंकल्यानंतर ते अव्वल स्थानावर आहेत आणि नेट रन रेट पाहता अव्वल स्थानावर राहतील.

पाकिस्तानचे गट-टप्प्यातील तिन्ही सामने पूर्ण झाले आहेत. तीनपैकी पाक संघाने दोन सामने जिंकले आहेत. युएई आणि ओमानचे संघही स्पर्धेबाहेर झाले आहेत. युएईचे देखील स्पर्धेतील आव्हान संपले असून त्यांनी एक सामना जिंकला. तर ओमानने सुरूवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत आणि संघाचा तिसरा सामना भारताविरूद्ध होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना देखील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, जिथे भारतीय संघाने पाकिस्तानला एकतर्फी पराभव पत्करला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १२७ धावा करता आल्या.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना देखील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला होता, जिथे भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव पत्करला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १२७ धावा करता आल्या. तर प्रत्युत्तरात भारतीय संघाने १५.५ षटकांत हे लक्ष्य सहज गाठत विजय मिळवला.