यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज (४ सप्टेंबर) भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. याआधी २८ ऑगस्ट रोजी हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या समन्यात हार्दिक पंड्या-रवींद्र जडेजा या जोडीने विजय खेचून आणला होता. या स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव हादेखील नेत्रदीपक कामगिरी करत असून आजच्या सामन्यात त्याला मोठा विक्रम रचण्याची संधी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> IPL 2023 मध्ये चेन्नई संघाचे नेतृत्व कोण करणार? मोठी माहिती आली समोर

सूर्यकुमार यादव भारतीय फलंदाजांमध्ये एका वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार लगावणारा खेळाडू ठरू शकतो. याआधी त्याने रोहित शर्माशी बरोबरी केलेली आहे. सूर्यकुमार यादवने यावर्षी १४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने आतापर्यंत ३१ षटकार लगावलेले आहेत. रोहित शर्माने २०१८ साली टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१ षटकार लगावलेले असून सूर्यकुमारने त्याची बरोबरी केली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात सूर्यकुमारने एक षटकार लगावला तर तो रोहित शर्माचा विक्रम मोडू शकेल आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार लगावणारा खेळाडू ठरू शकेल.

हेही वाचा >>> “कृपा करून आज विजयी व्हा” ‘मारो मुझे मारो’ फेम मोमीनने पाकिस्तानी संघासमोर जोडले हात; म्हणाला “…तर मी वेडा होईन”

दरम्यान, एका वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद रिझवान याच्या नावावर आहे. रिझवानने २०२१ साली ४२ षटकार लगावले होते. सूर्यकुमार यादव आशिया चषक स्पर्धेत चांगली फलंदाजी करताना दिसतोय. त्याने हाँगकाँग विरोधातील सामन्यात अवघ्या २६ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak suryakumar yadav may break record of rohit sharma of most sixes prd